शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दहशत कायम

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST

बिबट तिसर्‍या दिवशी म्हणजे काल १८ जून रोजी काही लोकांना माळेगाव गोंड फाट्यावर दिसल्याने या बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झालीआहे.

नांदुरा : सोमवारी तालुक्यातील तिकोडी शिवारात एका बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. परिसरातील नागरिकांनी या बिबट्याला हाकलून लावल्याने तो पसार झाला होता. दुसर्‍या दिवशी मंगळवारी दिवसभर हा बिबट्या कुठेच आढळून न आल्याने जवळच असलेल्या बोथा जंगल शिवारात गेल्याची चर्चा परिसरात सुरु होती. मात्र हा बिबट तिसर्‍या दिवशी म्हणजे काल १८ जून रोजी काही लोकांना माळेगाव गोंड फाट्यावर दिसल्याने या बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झालीआहे. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कळस्कार यांच्या तिकोडी शिवारातील शेतात एका निंबाच्या झाडाखाली शेतात जाणार्‍या काही महिला मजुरांना एक बिबट आराम करीत असल्याचे सोमवारी आढळून आले. बिबट दिसताच या महिलांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्याच झाडावर चढून आश्रय घेतला. बिबट असल्याची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनीही त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्याला पकडण्यासाठी वनविभागालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र झाडाच्या शेवटच्या फांदीवर त्याने आश्रय घेतल्याने त्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. दुपारी तिकोडी परिसरातील लोकांनी हा बिबट झाडाखाली येताच त्याला हाकलून लावले होते. त्याला हाकलून लावतांना त्याने केलेल्या हल्यात वनकर्मचारी व गावकरी असे दोघेजण जखमी झाले होते. त्यानंतर मात्र रात्रीच्या अंधारात हा बिबट पसार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम होते. मात्र तो दिवसभरात दूरवर परिसरात कुठेच आढळून न आल्याने तो जवळच असलेल्या बोथा जंगलात निघून गेल्याची चर्चा सुरु होती. परंतु तिसर्‍या दिवशी म्हणजे काल बुधवारी तो सायंकाळचे सुमारास माळेगाव गोंड फाट्यावर काही लोकांना आढळून आला. त्यामुळे परिसरात त्याची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करुन त्याच्या दहशतीतून आमची सुटका करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.