शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता... लोणार सरोवरात चक्क मासे ! प्रशासनाला झटका, जैवविविधतेची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:46 IST

सरोवर परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे

मयूर गोलेच्छा, लोकमत न्यूज नेटवर्क, लोणार (जि. बुलढाणा) : दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जगविख्यात लोणार सरोवरातील खाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे दिसू लागले आहेत. सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी महिनाभरापूर्वी ‘सरोवरात मासे असूच शकत नाहीत’ असे ठाम विधान केले होते. मात्र, आता पारदर्शक झालेल्या पाण्यात माशांचे प्रत्यक्ष अस्तित्व स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे सरोवर परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांचा दावा

दर मंगळवारी कमळजा मातेच्या दर्शनासाठी सरोवरात येणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पाण्यात विविध आकाराचे मासे पाहिल्याचा दावा केला. काहींनी व्हिडिओ व छायाचित्रे टिपली आहेत. ‘आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाण्यात मासे पाहिले,’ असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिणामी प्रशासनाचे ‘सरोवर मासेविरहित आहे’ हे विधान आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

अतिवृष्टीचे गोडे पाणी, सांडपाणीही मिसळते

सरोवराच्या क्षारतेमुळे येथे पूर्वी कोणत्याही प्रकारचे मासे टिकू शकत नव्हते. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांद्वारे गोडे पाणी आणि सांडपाणी सरोवरात मिसळल्याने वातावरणात बदल झाला. ‘लोकमत’ने २२ सप्टेंबर रोजीच ‘सरोवरात तिलापिया माशांचा प्रवेश’ झाल्याचे वृत्त दिले होते. तज्ज्ञांच्या मते, पाण्याचा खारटपणा कमी झाल्याने माशांच्या काही प्रजातींसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरोवराच्या आत, कमळजा मातेच्या मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात मासे दिसून आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी अमरावती येथे पाठविले आहेत. सोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत.-चेतन राठोड, सज्यय्यक वनसंरक्षक, वन्यजीव अकोला

English
हिंदी सारांश
Web Title : Surprise! Fish Found in Lonar Lake; Biodiversity at Risk

Web Summary : Contrary to official claims, fish have been spotted in Lonar Lake, raising concerns about the biodiversity of the area. Heavy rainfall altered the water's salinity, creating a suitable environment for fish, including Tilapia. Samples are being tested, and measures are underway.
टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणा