शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

६३ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Updated: June 20, 2014 00:17 IST

शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची मोठय़ा प्रमाणावर पेरणी करणार आहेत.

सिंदखेडराजा : यंदाच्या खरीप पिकाची पेरणी तोंडावर आली असून यंदाही शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची मोठय़ा प्रमाणावर पेरणी करणार आहेत. त्याखालोखाल शेतकर्‍यांनी कापूस या पिकाला पसंती दिली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ६५ हजार ५६0 हेक्टर एवढे असून ६३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकरी बांधवांनी तृणधान्य आणि कडधान्याच्या पिकाकडे पाठ फिरवली असून, या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मात्र कमालीचे घसरले आहे. त्यामुळे यंदा चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा तब्बल ३२ हजार ३६२ क्षेत्रावर सोयाबीन तर २१ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात येणार आहे. सोयाबीन या पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र २२ हजार १00 हेक्टर तर कपाशीचे सरासरी लागवड क्षेत्र २0 हजार ५४0 हेक्टर एवढे आहे. शेतकरी बांधवांचा सोयाबीन आणि कपाशी या नगदी पिकांच्या पेरणीकडे ओढा वाढत असतांना दुसरीकडे तृणधान्य पिकांकडे शेतकर्‍यांनी मात्र पाठ फिरविली आहे. तृणधान्य पिकाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र ८ हजार ८१0 हेक्टर एव्हढे असतांना यंदा शेतकरी बांधव अवघ्या १ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरच तृणधान्याची लागवड करणार आहेत. यात ज्वारी ५९९ हेक्टर क्षेत्रावर, मका ५९२ हेक्टर क्षेत्रावर, बाजरी ४0 हेक्टर क्षेत्रावर आणि अन्य तृणधान्ये ८६ हेक्टर क्षेत्रावर याप्रमाणे पेरणी होणार आहे.कडधान्य पिकाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र १३७३0 हेक्टर एव्हढे असून यंदा मात्र अवघ्या ७ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड होणार आहे. यात तुर ३ हजार ३६१ हेक्टर, उडीद एक हजार ७८१ हेक्टर, मुग २ हजार २८७ हेक्टर तर अन्य कडधान्ये ८५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनी पेरणीची तयारी करुन ठेवली असून तो शेतीच्या अंतीम मशागतीला लागला आहे. खत, बियाणे यांची खरेदी करण्याची घाई शेतकरी करत आहेत. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचे भाव आकाशाला भिडले असल्याने अनेक शेतकरी बांधवांचा घरगुती बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. मृग नक्षत्र सरत असून अद्याप मृगधारा सार्वत्रीक बरसल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधव मोठय़ा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे पेरण्या अद्याप मोठय़ा प्रमाणावर सुरु झाल्या नाहीत.