शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगरपालिकेचा कारभार रामभरोसे !

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

खामगाव नगरपालिकेचे अधिकारी दौर्‍यावर

गिरीश राऊत / अनिल गवई/ खामगाव
प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. नगर पालिकेतील अधिकारी दौर्‍यावर तर कर्मचारी वार्‍यावर असल्याचे चित्र नगर पालिकेच्या सर्वच विभागात आहे. अधिकारी कर्मचारी जागेवर नसल्याने नगर पालिकेतील विविध कामे प्रभावित झाल्याचेच लोकमतने आज दूपारी १२ ते २ वाजे पर्यंत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले .
नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नगर पालिकेतील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात आला आहे. त्याचप्रमाणेच प्रशासकांकडे अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांना नगर पालिकेशी काही सोयर सूतक नसल्याचे दिसून येते. प्रशासक पदाची सुत्रे घेईपर्यंतच उपविभागीय अधिकारी नगर पालिकेत उपस्थित राहिले. मात्र, त्यानंतर प्रशासकाकडील कारभाराचा व्याप पाहता नगर पालिकेत येण्याची शक्यता नसल्याने आधीच सैरभैर झालेले नगर पालिका कर्मचारी चांगलेच मोकाट झाले. काही कर्मचारी तर चक्क कार्यालयीन वेळेतच गायब राहत असल्याचे चित्र आहे. मुख्याधिकार्‍यांसह अनेक विभागाचे प्रमुख आज बुधवारी बुलडाणा आणि अकोला येथे दौर्‍यावर होते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत आज नगर पालिकेतील कारभार चांगलाच ढेपाळला होता. वरिष्ठ नसल्यामुळे नगर पालिकेतील अनेक विभागातील कर्मचार्‍यांनी अघोषीत सुटीचा मनमुराद आनंद लुटला.