शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळी उभारणार जलकुंभ

By admin | Updated: December 8, 2014 01:26 IST

लोणार येथील जुने जलकुंभ पाडण्याचे आदेश.

लोणार (बुलडाणा): जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या शहरातील जुने जलकुंभ पाडण्याचे आदेश नागपूर येथील स्ट्रक्चरर कन्सल्टन्ट एजन्सीच्या चमूने ६ डिसेंबर रोजी दिले. जुन्या जलकुंभाच्या ठिकाणी जास्त क्षमतेचे नवीन जलकुंभ पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारले जाणार आहेत. जागतीक दर्जाच्या पर्यटन स्थळी वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत कालीन पाणीपुरवठा योजनेवरुनच पाणीपुरवठा सुरु आहे. येथे जनुना, काळेपाणी आणि गायखेड धरणावरुन पाईपलाईनद्वारे तीन जलकुंभात पाणी साठवून पाण्याचे वितरण करण्यात येते. कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे पर्यटनस्थळालाच तब्बल २५ वर्षापासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लोणारला कायमस्वरुपी पाणीपुरवठा होण्यासाठी दहा वर्षापूर्वी सुजल निर्मल योजनेला मंजुरात मिळाली होती. या योजनेअंतर्गत तालुक्यातील बोरखेडी धरणावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेतुनच जिर्ण झालेले जलकुंभ पाडून त्याठिकाणी अधिक पाणी साठवणूक क्षमता असलेल्या जलकुंभाची निर्मिती करण्यासाठी नागपूर येथील स्ट्रक्चरर कन्सल्टन्ट एजन्सीच्या अभियंत्या मिनल व्ही. देहदेराई यांनी जलकुंभांची पाहणी केली. त्यानंतर ते तात्काळ पाडून नवीन प्रस्ताव पाठविण्याचे संकेत दिले. लोणारला पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, ते कोण त्याही क्षणी पडू शकतात, असा अहवाल बांधकाम विभागाने दिल्याने त्यामध्ये पाणीसाठविणे बंद करण्यात आले आहे.