शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवेळ कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता

By admin | Updated: December 20, 2014 00:17 IST

कामगार कल्याण मंडळ : सेवाशर्तीचे नियम डावलले.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा राज्यातील कामगार कल्याण मंडळाअंतर्गत अर्धवेळ कर्मचार्‍यांची भरती करताना सेवाशर्तीचे नियम डावलण्यात आले. गेल्या दोन वर्षात भरतीत अनियमिततेमुळे काही मंडळ सदस्यांनी स्वहित साधले. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचार्‍यांसह २0-२५ वर्षे अर्धवेळ सेवा झालेले कर्मचारी सेवेपासून वंचित राहिले आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या २५ जुलै २0१३ च्या परिपत्रकानुसार कामगार कल्याण मंडळात अर्धवेळ कर्मचारी भरती करताना विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील केंद्रातील अर्धवेळ कर्मचार्‍यांच्या रिक्त पदासाठी उमेदवार सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात यावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातील कामगार कल्याण मंडळात तब्बल १२५ पेक्षा जास्त अर्धवेळ कर्मचार्‍यांनी नियमबाह्य भरती करण्यात आली आहे. यात अकोला, औरंगाबाद विभागाला सर्वाधिक अर्धवेळ कर्मचार्‍यांचा भरणा करण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अकोला विभागार्तंगत अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये एकूण ३५ केंद्र विभागीय व गट कार्यालयात जवळपास २५ अर्धवेळ कर्मचार्‍यांची नेमणूक अशासकीय सदस्यांच्या दबावातून केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागीय कार्यालयात जवळपास ४0 अर्धवेळ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खर्‍या अर्धवेळ कर्मचार्‍यांवर अन्याय झाला आहे. राज्यात एकूण २३५ कामगार कल्याण केंद्रे असून, ७ विभागामध्ये १९ गट कार्यालये आहेत. राज्यातील कामगार कल्याण मंडळात अडीच हजाराच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र शासनसेवा निर्धारित नियमांना डावलून जवळपास दीडशेच्यावर कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली आहे.