शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर कर्ज भरणार्‍यांवर अन्याय

By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST

उशीरा कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.

खामगाव: पीक कर्जाचे गारपीटग्रस्तांना पुनर्गठण करताना वेळेवर भरणा करणार्‍या शेतकर्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांचे त्या आदेशामुळे अन्याय होत असून उशीरा कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाने पीक कर्ज १ लाखापर्यंत बिगरव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पीक कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असते. मार्च महिन्यातच शेतकरी कर्ज नवे जुने करुन जुने कर्ज भरुन पुन्हा पीक कर्ज उचलतात. त्याला निल करुन कर्ज उचलणे असे संबोधले जातात. मात्र यावर्षी ज्या भागात गारपीट झाली असेल त्या भागातील शेतकर्‍यांना शासनाचे अनुदान मिळाले असेल अशा शेतकर्‍यांना शासनाने कर्जाचे पुनर्गठण करुन त्यांच्याकडील कोणतीही शेतीची कर्ज वसुली करण्यास ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुनर्गठण म्हणजे मागच्यावर्षी ज्या शेतकर्‍याला १ लाखाचे पीक कर्ज देण्यात आले होते त्या शेतकर्‍यांना यावर्षी पुन्हा मागच्यावर्षीचे १ लाख न भरता पुन्हा १ लाखाचे पीक कर्ज देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ह्या मागच्या १ लाख कर्जाचे २ ते ३ हप्ते भरुन २ ते ३ वर्षात ते भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यावर्षी शासनाने गारपीटग्रस्तांसाठी सदर पुनर्गठण योजना तालुक्यातील काही गावांसाठी मंजूर केली आहे. खामगाव येथील बँक ऑफ बडोदा या शाखेत सदर योजनेचे अर्ज शासनाच्यावतीने बँकेने स्विकारणे सुरु करुन पुनर्गठण कर्ज वाटप सुरु केले. जिल्हाधिकारी यांनी बँकेला पाठविलेल्या पत्रात ज्या शेतकर्‍यांनी ३0 मार्च २0१३ नंतर कर्ज घेतले आहेत अशांना पुनर्गठण कर्जाचा लाभ द्यावा त्यामुळे ३१ मार्च २0१३ ही वेळेवर भरणा करुन कर्ज काढणार्‍यांची तारीख असतांना त्यानंतर म्हणजे वेळ चुकून कर्ज काढणार्‍या एप्रिलच्या पुढच्या महिन्यात उचल करणार्‍या शेतकर्‍यांना पुनर्गठण व वेळेवर कर्ज भरणा करणार्‍यांना मात्र पुनर्गठणाचा लाभ नाही. त्यामुळे वेळेवर कर्ज भरणारे शेतकरी बांधवांमध्ये शासनाबाबत प्रचंड असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वेळेवर कर्ज भरणारे जास्त आहेत व वेळ चुकून कर्ज भरणारे कमी आहेत. मात्र जिल्हाधिकारी यांच्या पत्रामुळे नियमित वेळेवर कर्ज भरणार्‍यांना हा पुनर्गठणाचा लाभ होणार नाही. पुनर्गठणात कर्ज एकाचवेळी १00 टक्के देणे आवश्यक आहे. मात्र काही बँका ५0 टक्के एका महिन्यात देणार. एकंदरीत या निर्णयामुळे शासनाच्या विरोधात वेळेवर भरणा करणार्‍या शेतकर्‍यांचा रोष वाढत असून नियमाप्रमाणे २0१३ मध्ये पीक कर्ज घेणार्‍या सर्वांंना गारपीटग्रस्तांना पुर्नगठण योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे एवढे मात्र खरे!