शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला अवकळा

By admin | Updated: December 5, 2014 00:12 IST

पाच तालुक्यात उद्योगच नाहीत : केवळ ४00 कारखाने सुरू.

बुलडाणा : कुठल्याही प्रदेशाची प्रगती मोजताना त्या प्रदेशातील रोजगाराची पातळी विचारात घेतली जाते. बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर आजही कृषी क्षेत्रावर आधारित रोजगार एवढीच बुलडाण्याची क्षमता आहे. औद्योगिक विकासासाठी विपूल प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध असतानाही येथील उद्योग व्यवसाय भरभराटीस आला नाही. राज्य शासनाने स्थापित केलेल्या औद्योगिक वसाहतीपैकी मलकापूर, खामगाव या दोन वसाहती सोडल्या तर उरलेल्या औद्योगिक वसाहतींना कुठलीही ओळख नाही. त्यामुळे या जिल्ह्यात रोजगाराची पातळी वाढविणारे औद्योगिक क्षेत्र विकसित होण्याची गरज आहे. जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आहेत; मात्र यामध्ये केवळ बोटावर मोजता येतील असे उद्योग कार्यरत आहेत. खामगाव येथे सर्वाधिक २७७ उद्योग सुरू असून त्याखालोखाल मलकापूरमध्ये १७२ उद्योग कार्यरत आहेत. चिखली, शेगाव, मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद अशा महत्त्वांच्या शहरांमध्ये रोजगाराची मागणी मोठय़ा प्रमाणात असतानाही येथील औद्योगिक वसाहतींना उद्योगाचे दर्शन झाले नाही. चिखलीच्या औद्योगिक वसाहतीत आजही शेती केल्या जाते. बुलडाण्यातील औद्योगिक वसाहतींमधील अनेक भूखंडांचे वाटप रखडलेले आहे. मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुर्‍यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे विपूल प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे शेती, बांधकाम व सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. येथील बाजारपेठेला मालाचा पुरवठा करणारा उद्योग जिल्ह्यात यावा, उद्योजकांना उद्योगासाठी मिळणार्‍या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पाण्याची समस्या भेडसावणार नाही, त्याचे नियोजन व्हावे व उद्योगामध्ये भांडवल निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे तरच येथील उद्योग क्षेत्र भरभराटीस येईल. नव्या सरकारकडून उद्योगावर विशेष भर दिल्या जात असल्याने बुलडाण्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही अच्छे दिनची अपेक्षा आहे.