शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना मिळणार अनुदान

By admin | Updated: July 8, 2014 23:36 IST

शेतकरी, शेतमजूर व स्वंयसहाय्यता महिला बचत गटांना उद्योगासाठी तसेच सर्वागीण विकासासाठी कृषी विभाग फिरते भागभांडवल उपलब्ध करुन देणार आहे.

खामगाव : एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेतकरी, शेतमजूर व स्वंयसहाय्यता महिला बचत गटांना उद्योगासाठी तसेच सर्वागीण विकासासाठी कृषी विभाग फिरते भागभांडवल उपलब्ध करुन देणार आहे. या कार्यक्रमात खामगाव तालुक्यातील ११ गावांचा समावेश असून १७४ बचतगटांना १ कोटी ६0 लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास व शाश्‍वत उपजिवीका सुरक्षिततेच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये शेतकर्‍यांबरोबरच भुमिहीन, बचत गटांना अर्थसहाय्य करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे धोरण कृषी विभागाने ठरविले आहे. राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम हा २0११-१२ ते १५-१६ पर्यंत राबविल्या जाणार आहे. या कार्यक्रमात खामगाव तालुक्यातील बोरी, बोथाकाजी, शहापूर, देऊळखेड, लोणीगुरव, दस्तापूर, अडगाव , गवंढाळा, आसा दुधा, आंबेटाकळी व कंचनपूर या गावांचा समावेश आहे. या गावातील ७ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर सामूहिक आराखड्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर ढाळीच्या बांधाचे कामे केली आहेत. शेतकर्‍यांच्या आर्थीक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांच्या सुक्ष्म सिंचन क्षेत्र वाढीसाठी शेतातील पाण्याचा वापर महत्वाचा ठरणार असून पाणी बचतीने

** सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिल्या जाणार आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शेतकर्‍यांबरोबरच भुमिहीन तसेच बचत गटांना समविचारी व एका विषयाने प्रेरीत असलेल्यांना उद्योग करावयाचा आहे. उद्योगासाठी फिरते भांडवल कृषी विभाग उपलब्ध करुन देणार असून कृषी विभागाच्या मध्यस्तीने बँक कर्जाऊ स्वरुपात भांडवल देणार आहे. पाच वर्षाच्या कालावधीत उद्योगासाठीची रक्कम परत करावयाची आहे. कृषी विभागाच्या वतीने समूह संघटक जयदेव राजनकर, मंगेश अढाव व कृषी तज्ञ विजय भागवतकर मार्गदर्शन करणार आहेत.