शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

खताचे नमुने तपासणीसाठी रवाना

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST

कालबाह्य खताच्या विक्रीचा गोरखधंदा

खामगाव : कालबाह्य झालेले रासायनिक खत थ्रेशरमधून बारीक करुन नवीन थैल्यात भरुन विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार काल येथे उघडकीस आल्यानंतर आज अमरावती येथील कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी खताची तपासणी करुन स्टॉक बुक जप्त केले. तर या खताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याशिवाय पुण्याचे गुणनियंत्रक आयुक्त जयंत देशमुख यांनीही भेट देवून प्रकरणाची चौकशी केली. यावेळी स्टॉक रजिष्टर तसेच गोदामाच्या भाडेकरारा बाबत कागदपत्रांची पाहणी केली असता त्यामध्ये सुध्दा तफावत आढळून आली. त्यामुळे खताचा हा गोरखधंदा मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याची बाब उघड होत आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मार्केटिंग फेडरेशनचे एकूण २0 गोदाम आहेत. या गोदामापैकी शेवटच्या गोदामात एप्रिल २0११ उत्पादन दिनांक असलेल्या इफको खताच्या थैल्या फोडून त्यामधील ढेकूळ झालेले खत थ्रेशरमधून बारीक करुन तसेच इंडियन फार्मर फर्टिलायझर कंपनी लिमिटेड पारादिप जि.जगतसिंगपूर (ओडिसा) या कंपनीच्या नावे नवीन मे २0१३ उत्पादन दिनांक प्रिंट असलेल्या थैल्यांमध्ये भरुन वजन न करताच सिल करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने ६ गोदामांना सील लावले होते. आज अमरावतीचे कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनोने, कृषि विकास अधिकारी भराड, उपविभागीय कृषी अधिकारी एम.बी.इंगळे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी यांनी भेटी देवून पंचनामे केले. तसेच वेगवेगळ्या खताचे १३ नमुने घेवून औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. दरम्यान सायंकाळी राज्य गुण नियंत्रण आयुक्त जयंत देशमुख, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दिलीप झेंडे यांच्यासह डॉ. जे.आर.टेकाडे, किरण जाधव या अधिकार्‍यांनी भेटी देवून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी यांच्याकडे चौकशी केली.