शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:44 IST

Father accused of killing daughter : मृतक महिलेचे पती, सासू, सासरा, दीर, नणंद अशा पाच जणांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कुलरचा शाॅक लागून नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वडिलांच्या तक्रारीनंतर कलाटणी मिळाली आहे. मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृतक महिलेचे पती, सासू, सासरा, दीर, नणंद अशा पाच जणांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील घिर्णी रोडवरील राणा प्रताप नगरात दुर्गा महेश चांडक (वय ३०) या विवाहित महिलेचा घरकाम करीत असताना कुलरमधून विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ३० जून रोजी घडली. प्रारंभी या घटनेत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनेतील मृतक महिलेचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला असल्याने तिच्या मृत्यूप्रकरणी अनेक शंका-कुशंका व्यक्त होऊ लागल्या होत्या. मृतक महिलेचे वडील राजेश श्रीकिशन राठी रा. कन्हान पाठशिवणी नागपूर यांनी ३ जुलै रोजी मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. ३० जून रोजी घडलेल्या घटनेत त्यांना दुपारी १२ वाजता त्यांची मुलगी गंभीर अवस्थेत आय.सी.यू.मध्ये भरती असल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले होते. परंतु माझ्या मुलीच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा छळ झाला असल्याचा आरोप राजेश राठी यांनी फिर्यादमध्ये नमूद केला आहे. त्याबरोबरच अनेक इतर बाबीसुद्धा त्यांनी नमूद केल्या आहेत. त्यावरून शहर पोलिसांनी विवाहितेचा पती महेश सुरेशचंद्र चांडकसह, जयश्री स्मित मोहता, सुरेशचंद्र चांडक, आकाश सुरेशचंद्र चांडक, सुनीता सुरेशचंद्र चांडक अशा पाच जणांविरुद्ध कलम ४९८ अ, ३०६, ३५ अन्वये भा.द.वि.चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता म्हसाये करीत आहेत. 

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी