शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नजरा आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2014 19:13 IST

पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

बाश्रीटाकळी : आकाशाकडे आस लावून बसलेल्या बळीराज्याच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. आता बळीराजांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी ठिबकचे पीकही धोक्यात आले आहे. बी-बियाणे व खतांची खरेदी झाल्याने बळीराजाकडे असलेला पैसा गुंतून पडला आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. यंदा पाऊस लवकर पडेल, या आशेने शेतकर्‍यांनी अगोदरच खते व हव्या असलेल्या निवडक वाणांचे बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. पाऊस पडल्यास वेळेवर हवे ते बियाण्यांचे वाण मिळत नाही. त्यामुळे अगोदरच बियाण्यांची खरेदी करून ठेवावी लागते. आता प्रतीक्षा आहे ती जोरदार पाऊस पडण्याची. राजंदा परिसरात पाणी पातळी खालावल्याने शेती पीक अडचणीत आले आहे. उन्हाळ्यासारखे तापमान असल्याने जमिनीला आता पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील अनेक गावांत विहिरीतील पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतकर्‍यांना पिकाच्या पाण्याबरोबरच गुरांच्या पाण्याचेही नियोजन करावे लागत असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. चारा टंचाई आणि पाणी टंचाई यामुळे शेतकरी हैराण झाला असून जनावरांची विक्री करीत आहेत. बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक गावात हिच परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. मागील वर्षाप्रमाणे मृग नक्षत्राचा पाऊस होऊन पेरणी सुरू करू, असा मानस असताना एक दिवस वादळी बेमोसमी पाऊस झाला व फायद्यापेक्षाही नुकसान करून गेला. शेतकर्‍यांनी मशागत करू न मोठय़ा प्रमाणात खर्च केला. महागडी बियाणे खरेदी केली; परंतु पावसाने चिंता वाढविली आहे. महागडी बियाण्यांची पेरणी करू नही पीक घरात येईलच, याची काही शाश्‍वती नसल्यामुळे बळीराजा आतापासूनच संकटात सापडला आहे. मागील वर्षी निसर्गाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या झाल्या होत्या. मृग नक्षत्रात पेरण्या झाल्यास उत्पन्न वाढते, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. २0१३ च्या दुष्काळाच्या जखमा अद्यापही भरल्या नसल्याने पाऊस कमी झाल्यास बळीराजा संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.