शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपये दिल्याशिवाय मिळत नाही मातेला बाळ

By admin | Updated: December 5, 2014 00:28 IST

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; सफाई कामगारांची दादागिरी.

बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला डॉक्टरांनी रुग्णालयातून सुटी दिली तरी, त्या वॉर्डातील महिला सफाई कामगार बाळ तुमच्या ताब्यात देतीलच असे नाही. त्यासाठी तुम्हाला सफाई कामगारांना २00 रुपये द्यावेच लागतात, असा धक्कादायक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळंतपणासाठी दररोज महिला रुग्ण भरती होतात. बाळ बाळंतिणीची प्रकृती सुधारली म्हणजे डॉक्टर रुग्णांना सुटी देतात; मात्र सुटी झालेल्या रुग्णांच्या ताब्यात लगेच बाळ दिल्या जात नाही. या वॉर्डात सफाई काम करणार्‍या महिला कर्मचारी सुटी झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून २00 रुपयांची सक्तीची वसुली करतात. तुमच्या बाळाची आम्ही काळजी घेतली त्याचे हे पैसे आहेत. ते द्यावेच लागतात. तोपर्यंत बाळ मिळणार नाही, अशी धमकीच या महिला सफाई कामगार रुग्णांच्या नातेवाइकांना देतात. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हिवाळे यांना विचारणा केली असता असा प्रकार माझ्या माहितीमध्ये नाही; मात्र असे घडत असेल, तर गंभीर बाब असल्याचे नमूद केले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात येणार असल्याचे लोकमत शी बोलताना स्पष्ट केले. *५0 रुपयांसाठी मागावी लागली मदतगुरुवार ४ डिसेंबर रोजी एका रुग्णाच्या नातेवाइकाजवळ पैसे नसल्यामुळे त्याला अक्षरश: गावात फिरून उसने पैसे आणावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला. रायपूर येथील एका बाळंत महिलेला रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर वॉर्डातील सफाई कामगार महिलेने सदर रुग्णाच्या नातेवाइकांना दोनशे रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडे पैसे नव्हते; मात्र तरीही पैसे आणा तेव्हा बाळ मिळेल, अशी धमकीच या महिलेने दिली. शेवटी नातेवाइकाला उसने पैसे आणून रुग्णालयातील या महिला कर्मचार्‍याला द्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.