शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या पदरी निराशा

By admin | Updated: December 6, 2014 00:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील भाजप आमदारांना मंत्रीपदाची हुलकावणी : ना.एकनाथ खडसेंचे ते वक्तव्य खरे ठरले.

बुलडाणा : पश्‍चिम वर्‍हाडातील सर्वात मोठय़ा असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला मंत्रीपदासाठी वेटींगवरच राहावे लागले आहे. सात विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने ३ व शिवसेनेने २ म तदारसंघ जिंकून युतीची पाठराखण केली; मात्र जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळाच्या विस् तारातही मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. विशेष म्हणजे दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गेल्या पंधरवड्यात बुलडाण्यात आलेल्या महसूलमंत्री ना.एकनाथ खडसे यांनी बुलडाण्याला मंत्रीपद मिळणार नाही, अकोला-बुलडाणा मिळून एकच मंत्रीपद राहील, असे वक्त व्य केले होते. आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पृष्ठभूमीवर ना.खडसे यांची वाणी खरी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तृळात होती.भारतीय जनता पार्टीच्या जन्माअगोदरपासून जनसंघामध्ये कार्यरत असलेले व त्यावेळी आमदार असलेले विद्यमान विधान परिषद सदस्य भाऊसाहेब फुंडकर हे भाजपचे दिग्गज व ज्येष्ठ नेतृत्व आहे. भाजपचे पहिले आमदार, अकोल्याचे खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशा पदांवर काम केलेल्या या अनुभवी नेतृत्वाला पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र आता विस्तारातही त्यांना स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचे संपूर्ण घराणेच संघ व भाजपामय आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेल्या आ.संचेती यांच्या पाठीशी दीर्घ अनुभव आहे. त्यांचे पक्ष संघटने तील योगदान, पक्षङ्म्रेष्ठींशी असलेली जवळीक पाहता त्यांनाही मंत्रीपदाची संधी मिळेल, असा अनेकांचा होरा होता; मात्र आ.संचेती यांच्या पदरीही निराशाच आली आहे.डॉ.संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवित भाजपाचा झेंडा फडकवत ठेवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली संघटनेची बांधणी, सभागृहातील त्यांची चमकदार कामगिरी व कामाची तडफ पाहून नव्या रक्ताला संधी म्हणून त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी अटकळ होती; मात्र तीही फोल ठरली आहे. जिल्ह्यात भाजपचे चार व सेनेचे दोन अशा सहा आमदारांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यामुळे आता पुढील विस्तारात तरी संधी मिळेल का, ही शंकाच आहे? * सेनेची लॉटरीही हुकलीभाजपच्या दिग्गज नेत्यांच्याच पदरी अशी निराशा आल्याने शिवसेनेला फारशी आशा नव्हतीच. विदर्भात सेनेला केवळ चार जागा मिळाल्या असून, त्यापैकी दोन जागा बुलडाण्यात असल्याने सेनेला मंत्रीपद मिळाले असते तर ती ह्यलॉटरीह्णच असती; मात्र ही लॉटरीसुद्धा यवतमाळमध्ये खुलली आहे.