धामणगावबढे (जि. बुलडाणा) : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीनजीक असलेल्या धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मंगेश अनिल इंगळे ( वय १५) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २0 सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मंगेश हा अनिल इंगळे यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}