शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कंत्राटदाराचा ठेका रद्द करा

By admin | Updated: December 8, 2014 01:30 IST

चिखली तालुक्यातील निकृष्ट पोषण आहार प्रकरण.

चिखली : अधिकार्‍यांशी संगनमत करून बालवाडीतील निरागस बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविणार्‍या व त्यांच्या आरोग्यास बाधा पोहचवून कुपोषणाच्या खाईत लोटणार्‍या पोषण आहार पुरवठादाराचा ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक आदींनी दिला आहे.अंगणवाडीतील बालकांना निकृष्ट दर्जाचा व कुजक्या कडधान्याचा पोषण आहार पुरविल्या जा त असल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाकडून पुरवठादार व जबाबदार अधिकार्‍यांना वाचविण्यात येत असून, याप्रकरणी थातूरमातूर चौकशी व पोषण आहाराचे चुकीच्या पद्धतीने नमुने घेऊन अधिकारी वर्ग स्वत:ला वाचविण्यासाठी सेविकांना दोषी ठरविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. असे असताना वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालून जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे असतानाही दुर्लक्ष होत असल्याने विनायक सरनाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना स्मरणपत्र दिले आहे. पोषण आहारातील कीड लागलेले व कुजके धान्य दिसून येते; मात्र एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला यात काहीच आढळून येऊ नये, ही बाब निश्‍चितपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असून, याप्रकरणी पारपदश्रीपणाने पोषण आहरासाठी पुरविल्या जाणार्‍या धान्य व इतर सामग्रीचे नमुने घेणे आवश्यक असताना अधिकार्‍यांनी अंगणवाडी सेविकांवर दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कुठल्याही जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीशिवाय नमुने घेऊन पोषण आहार चांगल्या दर्जाचा असल्याचा निर्वाळा दिला आहे. याप्रकारामुळे संबंधित कार्यालय व अधिकार्‍याचे पोषण आहार पुरविणार्‍या पुरवठादाराशी संगनम त असल्याचे सिद्ध होत असून, त्याला वाचविण्यासोबतच स्वत:चीही चामडी शाबूत ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याने याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येऊन याप्रकरणातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.