शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मानव विकास’च्या बस शोभेच्या वस्तू

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

एसटी बसेस बंद : सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थिनींची हेळसांड

सिंदखेडराजा : मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेमध्ये येजा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी बसेसद्वारे व्यवस्था सुरु करण्यात आली. मात्र २६ जून रोजी शाळा उघडून सुद्धा अनेक विद्यार्थीनींना या सवलतीचा शिक्षण विभाग व शाळेच्या हलगर्जीपणामुळे फायदा घेता येत नसुन दररोज ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तर काही ठिकाणी मानव विकास मिशनच्या एस.टी. बसेस सुरु करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे.
बाहेरगावी शिक्षण घेणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाणे आणि त्यांच्या गावाला परतने सोयीचे व्हावे या उद्देशाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून तालुक्यात एस.टी. बसेस सुरु करण्यात आल्या. राज्य परिवहन मंडळाकडून या बसेस चालविल्या जातात. सिंदखेडराजा तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत ५ बसेस आहेत. त्याही आज १५ दिवस उलटुनही सुरु करण्यात आल्या नव्हत्या. ७ जुलैपासून दोन बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी सिंदखेडराजा ते गारखेड तांडा या गाडीत ६५ विद्यार्थिनी, दुसरबीड ते बोरखेडी गंडे या गाडीत ११0 मुली, साखरखेर्डा ते शेंदुर्जन ८२ मुली, दुसरबीड ते केशवशिवणी ८६ मुली प्रवास करीत होत्या. मानव विकासच्या नियमानुसार एका रुटवर ८ ते १२ मध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीची संख्या १२0 पाहिजे. त्यातच गेल्यावर्षी सिंदखेडराजा शिक्षण विभागांतर्गत मुलींसाठी ६६६ सायकलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी त्या विद्यार्थीनींना मानव विकासच्या बसचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत फक्त एमईएस हायस्कूल साखरखेर्डा १0६ पासेस, जिजामाता विद्यालय साखरखेर्डा ३८ पासेस, जिजामाता विद्यालय सिंदखेडराजा ५१ पासेस देण्यात आल्याचे सिंदखेडराजा बसस्थानकातून कळाले. म्हणजे तालु क्यातील सर्व विद्यार्थीनी आर्थिक भुर्दंड सहन करीत आहेत. त्यासाठी महामंडळ किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्याबाबत गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसत आहे. मानव विकास मिशनकडून विद्यार्थीनींची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावित, अशी अपेक्षा विद्या र्थीनी व पालकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान मानव विकासच्या पासेस बसस्थानकात उपलब्ध असून, शाळेकडून याद्या आल्या नाही. याद्या आल्यास पासेस त्वरीत उपलब्ध होऊ शक तील, असे जि.टी.गायकवाड, येथील पास वितरक यांनी कळवले. तर तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी.मखमल यांनीअद्यापपर्यंत शाळेकडून येजा करणार्‍या विद्यार्थीनीच्या याद्या उपलब्ध झाल्या नसुन सर्व शाळेच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर गाड्या सोडण्यात येतील, असे सांगीतले.