शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

By दिनेश पठाडे | Published: April 24, 2024 12:41 PM

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे.

- दिनेश पठाडे बुलढाणा - लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विधानसभानिहाय तयारी पूर्ण करण्यात आली असून जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने त्या-त्या विभागाला कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे यासह कर्मचाऱ्यांना बूथस्थळी घेऊन जाण्यासाठी एसटी बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २७० बसेस २५ आणि २६ एप्रिलपर्यंत निवडणुकीविषयक कामकाजासाठी राखीव असणार आहेत. सर्व बसेस सुव्यवस्थित पाठविल्या जाणार असून त्यासाठी प्रत्येक बसेसची आवश्यक तपासणी मागील दोन ते तीन दिवसांपासून केली जात आहे. प्रत्येक बसेसच मेटनन्स, टायर चेकअप, कुशनची व्यवस्था व इतर बाबींची दक्षता घेऊनच गुरुवारी बसेस निवडणूक मतदान कामासाठी रवाना होणार आहेत. दोन दिवस एसटीचा प्रवास टाळा२६ एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातून २७० बसेस राखीव ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळीच बसेस निवडणूक कामासाठी रवाना होतील. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस जिल्ह्यातील आगार अंतर्गत धावणाऱ्या बसेस जवळपास बंदच राहणार आहेत. जिल्हा बाहेरील आगाराच्या बसेस तेथील नियोजनानुसार सुरु राहू शकतात, असे बुलढाणा आगार व्यवस्थापकांकडून कळविण्यात आले. कोणत्या आगारातील किती बसेस राखीवबुलढाणा : ४२चिखली : ३९खामगाव : ३१मेहकर : ८६जळगाव जामोद : ४०मलकापूर : ३२ 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४buldhana-pcबुलडाणाstate transportएसटी