शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

खामगाव येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:54 AM

Covid Care Center News कार्यरत आरोग्य कर्मचारी आपल्या पूर्वीच्या कर्तव्यावर हलविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : तालुक्यातील कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे  पिंपळगाव राजा रोडवरील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची वाणवा असून, रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचारी आपल्या पूर्वीच्या कर्तव्यावर हलविण्यात आले आहेत. दरम्यान,  कोविड केअर सेंटर बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.कोरोना संक्रमण कालावधीत खामगाव येथील शासकीय मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहात तब्बल २०० रुग्णक्षमता असलेले कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या वसतिगृहात १५० तर मुलांच्या वसतिगृहात ५० रुग्णक्षमता असलेले बेड सुसज्ज होते. बुलडाणा येथील जिल्हा प्रशासनाकडून येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तेथूनच आवश्यक त्या साहित्याची खरेदी करण्यात आली होती. रुग्णांचे जेवण आणि इतर सुविधा तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोविड केअर सेंटरवरील साहित्याबाबत संदिग्धता असल्याचे दिसून येते. याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला.

दोघांचा क्वारंटाईन कालावधी पूर्णविदेशात आणि भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, ब्रिटन येथून आल्यानंतर खामगावात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यामुळे कोविड स्ट्रेन-२ बाबत कोणतीही भीती आता राहिलेली नाही.

सेंटरमधील साहित्याबाबत संदिग्धता खामगाव तालुक्यासह परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा स्फोट झाल्यानंतर खामगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढीस लागल्यानंतर पिंपळगाव राजा- घाटपुरी रोडवरील मुलींच्या वस्तीगृहाच्या बाजूलाच असलेल्या मुलांच्या वस्तीगृहात कोविड केअर प्रतीक्षालय सुरू करण्यात आले.  दोन्ही कोविड केअर सेंटरसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून साहित्य खरेदी करण्यात आले. तसेच येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तर तहसील प्रशासनाकडून जेवण आणि इतर सुविधा देण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या