शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भर जहागीर, शिरपूर गावावर शोककळा, चौघांचे पितृछत्र हरविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 12:21 IST

लोणार जि. बुलडाणा येथील रविवार पहाटे  झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जणांचा मृत्यू झाला.

भर जहागीर/शिरपूर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील रविवार (23 सप्टेंबर) पहाटे  झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने 19 ते  28 वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर चार चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले आहे. 

सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या  बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना (ता. लोणार) गावाजवळ लक्झरी वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. बँड पार्टीच्या पीकअप वाहनात भर जहागीर व शिरपूर येथील एकूण 13 ते 14 जण होते.  यापैकी ज्ञानेश्वर वामन डोंगरे (19), चालक अरूण संजय कांबळे (22),  राजू भगवान कांबळे (23) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (25) व गणेश सदाशीव बांगरे (32) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.

मृतक ज्ञानेश्वर डोंगरे याच्या कुटुंबात केवळ आई असून, ज्ञानेश्वर हाच आईचा आधारवड होता. ज्ञानेश्वरच्या अपघाती निधनाने आई पोरकी झाली असून वृध्दापकाळातील आधारवड गेल्याने आईने एकच आक्रोश केला. मृतक अरूण कांबळे याचे गेल्यावर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण आहे. कुंकवाचा धनी गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. कांबळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मृतक राजू कांबळे याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ व विवाहित बहीण आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला. 

मृतक प्रवीण कांबळे याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वाजंत्रीचे काम करून प्रवीण हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी व 3 वर्षीय चिमुकल्याचे छत्र हरविल्याने कुटुंब पोरके झाले. मृतक गणेश बांगरे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई , वडील, दोन भाऊ आहेत. मृतक गणेशची लहान मुलगी 6 महिने वयाची असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिर्वाहाचा गहण प्रश्न निर्माण झाला. अपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली. पाच कुटुंबियांच्या आक्रोशाने आसमंत भेदून गेला. दरम्यान या दुर्देवी घटनेतील अन्य आठ जखमीवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :AccidentअपघातwashimवाशिमDeathमृत्यू