शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावांचा कारभार ३१ कर्मचार्‍यांवर

By admin | Updated: July 7, 2014 22:40 IST

वीज वितरण कंपनीत कर्मचार्‍यांचा अभाव

धाड : धाड व परिसरातील जवळपास ४७ गावांचा कारभार पाहण्यासाठी केवळ ३१ कर्मचारी उपस्थित असल्याने या भागात विजेच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय धाड अंतर्गत ४७ गावांचा समावेश येतो. तर धाड, धामणाव, चांडोळ, रायपूर याठिकाणी पाच ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रे आहेत. शासनाकडून या विभागात लाईनमन, तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ तसेच लाईन ऑपरेटर अशी पदे वीज कार्यालयात निर्माण करुन वीज ग्राहकांना वेळेत सुरळीत वीज पुरवठा, तात्काळ तक्रारी निवारण, आपत्कालीन सेवा, कृषी, पाणी पुरवठा यासह वीज बिल वसुली यासारखी कामे सुरळीत होऊन समस्या मार्गी लावण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. अंदाजे २५ कि.मी. च्या परिघात असणार्‍या ४७ गावांना, सर्व स्तरावर कामासाठी आवश्यक असणार्‍या शासन स्तरावरुन ५८ जागा याठिकाणी आहेत. पैकी आजरोजी केवळ ३१ कर्मचारी कार्यरत असल्याने या भागात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होताना दिसत नाही. बहुतांश रात्री दरम्यान उद्भवणार्‍या तक्रारी ह्या त्याच वेळेत सुटत नसून दोन-दोन दिवस नागरिकांना छोट्या-छोट्या समस्येवरुन अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे. धाड उपविभागात असणार्‍या पाच ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत ३५ तंत्रज्ञ पैकी १६ तंत्रज्ञ हजर आहे. तर १८ कनिष्ठ तंत्रज्ञ पैकी १0 कनिष्ठ तंत्रज्ञ हजर आहे. तसेच १६ लाईन ऑपरेटर पैकी केवळ ५ लाईन ऑपरेटर हजर असल्याने याठिकाणी दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असून या भागात या-ना त्या कारणावरुन अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो आहे. ग्रामीण पाणी पुरवठय़ाच्या जोडण्या, कृषी क्षेत्रावर असणार्‍या जोडण्या व त्याठिकाणी सातत्याने ट्रान्सफार्मरमध्ये होणारे बिघाड वा इतर तक्रारी अनेक दिवस मार्गी लागताना दिसत नाहीत. आज रोजी धाड वीज वितरण कंपनीच्या उपविभागात १७ हजारावर घरगुती वीज जोडण्या आहेत तर ९ हजार कृषी पंप, १ हजार व्यापारी वापराच्या, २५0 चे वर औद्योगिक तर ७२ सार्वजनिक पाणी पुरवठय़ाच्या अशा २७ हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी वीज वितरण जवळ ३१ कर्मचारी संख्या हजर आहेत. पैकी धाड, चांडोळ, रायपूर हे गावे २0 हजार लोकसंख्येची असून प्रत्येकवेळी पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत वीजेचा होणारा पुरवठा कोलमडून नियोजन कोसळते. भरीसभर ग्रामीण भागात वीज बिलात असणार्‍या प्रचंड चुका पाहता बहुतेक तक्रारी ह्या ह्याबाबत राहतात मात्र प्रत्यक्षात वीज कर्मचारी उपलब्ध नसल्याने ह्या तक्रारींचे योग्य निरसन होताना दिसत नाही. तर परिणामी वीज बिलाची वसुलीवर ह्याचा परिणाम होत आहे. व वीज ग्राहकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनी केवळ आपल्या आर्थिक लाभासाठी ग्रामीण जनतेस वेठीस धरुन त्यांना त्रास देत आहे. या परिसरात छोट्या-छोट्या विजेच्या तक्रारीसाठी दिवसेंदिवस ह्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ नागरिकांवर आहे. परिणामी वीज ग्राहकांना बरेच कामे खाजगी व्यक्तींकडून पैसा भरुन करुन घ्यावे लागत आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरुन तात्काळ कार्यवाही होऊन येथे कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.