शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ३४00 रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: December 8, 2014 01:28 IST

जीवनदायी योजनेला एक वर्ष पूर्ण : उपचारापोटी रुग्णालयांना १४ कोटी रुपये प्रदान

फहीम आर. देशमुख / शेगावगंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणार्‍्या गोरगरीब रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या योजनेला बुलडाणा जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालेले असून, या योजनेला शासनाने पुढील एक वषार्साठी नू तनीकरण करून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक व दारिद्रय़रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, रुपये एक लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, अं त्योदय व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी विमा कंपनीच्या सहभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २0१२ पासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली ही मह त्वाकांक्षी योजना आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्या पहिल्या टप्प्यात ८ जिल्ह्यांमध्ये २ जुलै २0१२ पासून राबविण्यात आली. तर महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २0१३ ला सुरु करण्य़ात आली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेला आता १ वर्षाच्या कालावधी पुर्ण झालेला असुन जिल्ह्यातील ३५00 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पोटी शासनाने १४ कोटी ११ लक्ष रुपये खर्च केल्याचे दिसुन येते.आतापयर्ंत या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ह्दय शस्त्रक्रियेसाठी ३९८ रुग्णांनी, अ ितदक्षता विभागात ९0 रुग्णांनी, ह्दयरोगासाठी ५२२ रुग्णांनी, कान नाक घसा शस्त्रक्रियेसाठी २६१५ रुग्णांनी, पोटांच्या शस्त्रक्रियेसाठी ५१0 रुग्णांनी, कॅन्सर उपचार १९१२ रुग्णांनी, डायलेसीस ५७७ रुग्णांनी, हाडाची शस्त्रकीया १९१ रुग्णांनी, न्युरोसर्जरी (मेंदुच्या शस्त्रक्रीया) १२0 रुग्णांनी, या योजनेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. या रुग्णांना फायदा देणार्‍या रुग्णालयांना उपचारापोटी १४ कोटी ११ लाख ९३ हजार ७१0 रुपये प्रदान करण्यात आल्याची माहिती राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक अमोल लहाने यांनी दिली.