शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By admin | Updated: July 6, 2014 23:32 IST

वीज भारनियमनामुळे मात्र आता पश्‍चिम विदर्भातील २२ हजार हेक्टरवरील पिकेही संकटात आहेत.

खामगाव: पावसाअभावी यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली आहे. तुषार व ठिबक सिंचनाव्दारे या पिकांना जगवण्याचे प्रयत्न शेतकर्‍याकडून केले जात असले तरी वीज भारनियमनामुळे मात्र आता पश्‍चिम विदर्भातील २२ हजार हेक्टरवरील पिकेही संकटात आहेत.
गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस व फेब्रुवारी-मार्च महिन्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाल्याने यावर्षी काही भागात अद्याप जलसाठा तग धरून आहे. मात्र महिनाभरापासून पावसाचा थेंबही नसल्याने ही जलाशय पातळी घसरली आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोरडा गेला तर आद्र्रा नक्षत्रही कोरडे जाण्याची भिती आहे. यामुळे शेतकर्‍यावर पेरणीचे फेरनियोजन करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कपाशीची लागवड केली. ठिबक व तुषार सिंचनाव्दारे पाणी दिले जात असून हवेत डोलणारी ही पिके जगविण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. अशातच विज वितरण कंपनीकडून कृषीपंपासाठी पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने या पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. अगोदरच एक दिवसाआड वीज पुरवठा होत आहे. मात्र त्यातही कधी ह्यब्रेकह्ण मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने शेतकर्‍यांना २४ तास वीज पुरवठय़ाकडे लक्ष देवून कपाशीला पाणी द्यावे लागत आहे. ठिबक व तुषार सिंचनावर उपलब्ध सिंचन सुविधेमध्येही बागायती शेती वीज भारनियमनाने धोक्यात आली आहे. अगोदर अस्मानी तर आता सुलतानी संकटाने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.