शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील १२ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:18 IST

MLA Sanjay Gaikwad's family corona positive स्वत: आमदार संजय गायकवाड हे अधिवेशनासाठी मुंबईत असल्याने ते निगेटिव्ह आहेत.

बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील १२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये त्यांच्या १४ दिवसांच्या नातीचाही समावेश आहे. त्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचारीही कोरोना बाधित आढळल्यामुळे ११ मार्चपर्यंत त्यांचे जनसंपर्क कार्यालय ही बंद राहणार आहे. स्वत: आमदार संजय गायकवाड हे अधिवेशनासाठी मुंबईत असल्याने ते निगेटिव्ह आहेत. सहा मार्च रोजी त्यांच्या कुटुंबातील १२ जण कोरोना बाधित आढळून आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले. यामध्ये त्यांची पत्नी, सून, १४ दिवसांची नात, दोन्ही पुतणे, वहिनी, भाचे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीस ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून अन्य कुटुंबीय हे विलगीकरणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईपिस्ट व वाहन चालकही कोरोना बाधित आढळून आल्याचे ते म्हणाले. परिणामी ११ मार्चपर्यंत त्यांचे जनसंपर्क कार्यालय बंद राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  १४ दिवसांची नात ही कोरोना बाधित आढळून आल्याने आपणास चिंता वाटते असे आ. गायकवाड म्हणाले.

बुलडाण्या शनिवारी एकाच दिवशी ८३७ जण कोरोना बाधित आढळून आलेले असतानाच हे वृत्तही समोर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSanjay Gaikwadसंजय गायकवाड