शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

१0 हजार कर्मचार्‍यांचे मानधन रखडले

By admin | Updated: June 30, 2014 02:09 IST

राज्यातील वसतिगृहातील कर्मचार्‍यावर उपासमारीची पाळी; बुलडाणा जिल्ह्यातील १२४ कर्मचार्‍यांचा समावेश.

सिध्दार्थ आराख / बुलडाणा
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहात काम करणार्‍या राज्यातील जवळपास १0 हजार ८00 कर्मचार्‍यांचे मागील पाच महिण्यापासून मानधन रखडले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १२४ कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वसतिगृहांतर्गत करण्यात येते. जिल्ह्यात असे ४१ वसतिगृह आहेत. ज्या संस्थेंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येते त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९00 ते ९५0 रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण विभाग देते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ४१ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्या र्थ्यांची प्रति वसतिगृह अशी पटसंख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मूलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिक्षक, एक मदतनिस आणि एक स्वयंपाकी अशी पदे मंजूर आहेत. मात्र ही पदे मानधन तत्वावर आहेत. गेल्या १0 वषार्पासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. या कर्मचार्‍यांना मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.
यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण असा संसाराचा गाडा कसा हकलायचा असा प्रश्न या कर्मचार्‍यापुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणत अंदाजे १0 हजार ८00 कर्मचारी वसतिगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचार्‍यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र हे मानधन मागील पाच महिण्यापासून थकीत ठेवण्यात आले आहे. अद्याप नीधी प्राप्त झाला नसल्याचे समाज कल्याण विभातून रसांगण्यात येते.
मागील काळात काही जिल्ह्यात कर्मचारी संघटनेने आंदोलन करून मानधन वेळेवर देण्यात यावे व कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयाकडे मानधनासाठी चकरा माव्या लागत आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतिगृहा त रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी करीत असून मानधन न मिळाल्यास कर्मचारी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.