शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना भूमापक जाळ्यात

By admin | Updated: June 10, 2015 00:25 IST

स्थानिक भूमीअभिलेख कार्यालयातील परिरक्षक भुमापक राधेश्याम श्रीराम क्षीरसागर (३२) याला तीन हजार रूपयांची लाच...

लाखनी येथील प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलाखनी : स्थानिक भूमीअभिलेख कार्यालयातील परिरक्षक भुमापक राधेश्याम श्रीराम क्षीरसागर (३२) याला तीन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारला सकाळी ११ वाजता करण्यात आली.तक्रारकर्त्यांच्या वडिलाने सन १९७९ मध्ये खरेदी केलेले प्लॉट शीट क्रमांक १० मधील नगर भुमापन क्रमांक ४८, क्षेत्रफळ २०६६ चौरस मीटरपैकी ९.४५ मीटर व १५.२४ मीटरचा प्लॉट खरेदी करून नोंदणी केली. तक्रारकर्त्याचे वडिल सन २०१० मध्ये निधन झाले असून तक्रारकर्त्यांचे वडिलांनी फेरफार न केल्यामुळे ३ जानेवारी रोजी लाखनी येथील भूमीअभिलेख कार्यालयात अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याबाबत संबंधित कागदपत्रासह अर्ज केला होता. या कार्यालयात संबंधित भुमापक क्षिरसागर यांना प्लॉटचे फेरफार करून देण्यासंबंधी विनंती केली असता वरिष्ठांशी चर्चा करुन फेरफार करून देतो, अशी टाळाटाळ करीत फेरफार करून दिले नाही.त्यानंतर तक्रारकर्त्यांनी ५ जून रोजी क्षीरसागर यांना भेटून फेरफार करण्याची विनंती केली असता तीन हजार रूपयांची मागणी करुन दि. ९ जून रोजी पैसे घेऊन येण्यासाठी सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार आज मंगळवारला भूमीअभिलेख कार्यालयात रचलेल्या सापळ्यात क्षीरसागर हे तीन हजार रूपये घेताना पकडण्यात आले. आरोपीने पदाचा दुरूपयोग करून भ्रष्ट मार्गाने लाच घेतल्याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यशवंत मतकर, पोलीस उपअधिक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, पोलीस हवालदार बाजीराव चिंधालोरे, अशोक लुलेश्वर, गौतम राऊत, मनोज पंचबुद्धे, भाऊराव वाडीभस्मे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)