शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी व शिक्षकांना कोविड लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने शासनाकडे केली आहे.

नवीन वर्षातही कोरोना जिल्ह्यात पसरत आहे. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. सद्यस्थितीत शहर व खेड्यांमध्ये कोरोनाची धास्ती अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत मानसिकदृष्ट्या विद्यार्थी व शिक्षक सुदृढ राहावा तसेच मनात असणारी भीती व्हावी, यासाठी प्राधान्याने विद्यार्थी व सर्व शिक्षकांना मोफत लसीकरण करण्यात यावे. कारण पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. भीतीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू तसेच प्रशासनातील आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक, पुणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. आतापासून उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाळा त्रासदायक राहणार आहे. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेची वेळ सकाळी ९ ते १२ अशी करण्यात यावी तसेच सुरु असणारे वर्ग सकाळ सत्रात भरविण्यासंबंधीच्या सूचना तत्काळ देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात याव्यात, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अंतर्गत गुण देण्यात यावेत, शाळा पातळीवरून गुण देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करण्याचे निर्देश शासनाने तातडीने द्यावेत तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने परीक्षा व त्याचे मूल्यमापन कसे करावे, या गोंधळात शिक्षक सापडले आहेत. पाचवी ते नववी व अकरावी या वर्गांच्या लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन याबाबत स्पष्टता करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, रेखा भेंडारकर, सहसचिव अर्चना बावणे, कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे, विष्णूदास जगनाडे, गोपाल बुरडे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, रवी मेश्राम, विपीनचंद्र रायपूरकर, अतुल बारई, राजू भोयर, सुनील गोल्लर, अनमोल देशपांडे, जी. एन. टीचकुले, प्रदीप मुटकुरे, दामोदर काळे आदींनी केली आहे.