शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी वाढले दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवार १४ जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये १४ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ४०४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ठळक मुद्देभंडारा व मोहाडी तालुका : ३९ व्यक्ती कोरोणामुक्त, पॉझिटिव्हची संख्या ५१ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल रविवार १४ जून रोजी प्राप्त झाला असून दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोना बांधीतांची रुग्ण संख्या ५१ झाली आहे.
रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
९ जून रोजी एक व्यक्ती गुजरात राज्यातील सुरत येथून मोहाडी तालुक्यात आला. तर ८ जून रोजी उत्तरप्रदेश येथील मेरठ येथून एक २५ वर्षीय तरुण भंडारा तालुक्यात आला. दोन्ही व्यक्तींच्या घशातील स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान आज रविवारी दोन्ही व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
रविवार १४ जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये १४ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ४०४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३०२ भरती आहेत. २१४९ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्र श्वास दाहचे एकुण १५८ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या तपासणीपैकी १५७ जणांचे नमुने निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ९०१ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तालुकानिहाय कोविड रुग्णांच्या संख्येनुसार भंडारा ७, साकोली २०, लाखांदूर १४, तुमसर १, मोहाडी २, पवनी ४ तर लाखनी तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

७ हजार २११ व्यक्ती होम क्वारंटाईन
पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४१७७४ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून ३४५६३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या ७२११ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या