शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर क्वारंटाईन सेंटर झाले यातनागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच्छता करून कर्मचारी येथून निघून जातात. त्यानंतर या केंद्राला कुणीच भेट देत नाही.

ठळक मुद्देअनेकांच्या तक्रारी : शासकीय वसतिगृहात सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करून संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. तुमसर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव असून १४ दिवस निवासी राहणाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर यातनागृह झाले आहे. केव्हा एकदा येथून सुटका होते याची प्रतीक्षा येथे क्वारंटीन असलेल्यांना लागलेली असते.
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच्छता करून कर्मचारी येथून निघून जातात. त्यानंतर या केंद्राला कुणीच भेट देत नाही. एका क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीने येथील आपबिती सांगून संबंधित केंद्रातील व्हीडीओ आणि फोटो सुद्धा काढून ठेवले आहे. येथील शौचालय घाणीने माखले असून पिचकाºयांनी कोपरे भरले आहे. वऱ्हांड्यात कचऱ्याचा खच पडलेला असून जीन्याच्या पाट्याही तुटल्या आहेत.
येथे वास्तव्यास असलेल्या व परदेशातून आलेल्या एका नागरिकाने स्थानिक प्रशासनाला संपर्क साधून माहिती दिली. परंतु एकमेकांचे नावे सांगून केवळ टोलवाटोलवी करण्यात आली. आता करावे तरी काय असा प्रश्न पडला आहे.

शासकीय मुलींच्या वसतिगृहात सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देऊन दररोज स्वच्छता केली जाते. घाणीचा प्रश्नच येत नाही. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी संपर्क साधून सूचना दिल्या जाते. समस्या असेलच तर त्या त्वरित दूर होतील.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या