रस्ता ओलांडताना ट्रकने विद्यार्थीनीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:48+5:30

महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघालेल्या एका विद्यार्थीनीला रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडले. ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.

The truck crushed the student while crossing the road | रस्ता ओलांडताना ट्रकने विद्यार्थीनीला चिरडले

रस्ता ओलांडताना ट्रकने विद्यार्थीनीला चिरडले

ठळक मुद्देभिलेवाडाची घटना : ट्रक सोडून चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघालेल्या एका विद्यार्थीनीला रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडले. ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.
सृष्टी किसन हाडगे (१८) रा. गणेशपूर (भंडारा) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती शहरालगतच्या भिलेवाडा येथील जे.जे. कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळी ती महाविद्यालयात जाण्यासाठी भंडारा येथून आॅटो रिक्षाने निघाली. भिलेवाडा येथे आॅटो रिक्षातून उतरून राष्ट्रीय महामार्ग पार करताना लाखनीकडून भंडाराकडे येणाऱ्या ट्रकने (क्रमांक सीजी ०७ सीए ८३७७) सृष्टीला धडक दिली. यावेळी ट्रकने मागील चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा होवून मेंदू रस्त्यावर फेकला गेला.
हा प्रकार दिसताच भिलेवाडा येथील नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला. नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कऱ्हाडे, बुरळे, अशोक सरोद आणि राठोड करीत आहेत. ट्रक जप्त करण्यात आला असून कारधा पोलीस चालकाचा शोध घेत आहे.
सृष्टी ही गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी असून आई मोल मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढते. या अपघाताने हाडगे परिवारावर दु:खाचा डोंगर पसरला. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण हळहळताना दिसत होता.

Web Title: The truck crushed the student while crossing the road

टॅग्स :Accidentअपघात