शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांचा राज्यव्यापी संप

By admin | Updated: May 25, 2017 00:18 IST

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलैपर्यंत तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्याचा अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निर्णय झाला आहे, ...

ग. दि. कुलथे यांचा इशारा : राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलैपर्यंत तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्याचा अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निर्णय झाला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी विश्रामगृह भंडारा आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक लटारे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार, महिला सहचिटणीस संघमित्रा ढोके, सहचिटणीस किशोर मिश्री कोटकर, जनसंपर्क सचिव माधव झोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग.दि. कुलथे यांनी शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरुन ६० वर्ष करणे, पांच दिवसाचा आठवडा, बाल संगोपन रजा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहण व दमदाटी करणाऱ्यांविरुध्द कठोर कार्यवाहीचा कायदा करणे, प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली सर्व पदे भरणे आदी मागण्यांचा उहापोह केला. तसेच राज्य शासनाने राजपत्रित अधिकारी महासंघास बांद्रा (पूर्व) येथे १३८१ चौ.मी. आकाराचा भूखंड १ रुपये या नाममात्र दराने उपलब्ध करुन १० कोटी रुपयाचा निधी कल्याण केंद्र बांधकामासाठी दिलेला आहे. या पवित्र संघटनात्मक कार्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीचे प्रास्ताविक व संचालन कार्याध्यक्ष डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिव डॉ. निनाद कोरडे यांनी मानले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, बी.एम. देवरे, एस.एम. तडस, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, जि.प. लेखाधिकारी किशोर पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. आर.बी. शहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. नंदेश्वर, तहसीलदार संजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शहारे, मुख्याधिकारी न.प. अनिल अढागळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी डी.वाय. देशमुख, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विनोद दाबेराव, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.बी. गेडाम, डॉ. ए.डी. चिखलीकर, डॉ. गुणवंत भडके, डॉ. युवराज केने, डॉ. प्रशांत वैद्य, डॉ. ए.बी.थूल, डॉ. निखील डोकरीमारे, नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे आदी विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबतच जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीचे प्रभाकर कळंबे, टी.आर.बोरकर, अतुल वर्मा, सतिश मारबते, विनोद राठोड आदी मंडळी उपस्थित होते.