शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

तीन भावडांनी शोधला शेतीतून उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक उन्नतीचा सुलभ मार्ग दाखविला आहे.

ठळक मुद्देपालांदुरच्या नंदनवार बंधूंचे परिश्रम : स्वप्नीलने फुलविली तीन एकरात बागायती शेती

लोकमत न्यूज नेटवर्कखराशी : जिद्द व नावीन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक पिकाला फाटा देऊन नवनवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील पालांदूर गावातील प्रगतशील शेतकरी असलेल्या स्वप्निल , आशिष व अंकुश शंकरराव नंदनवार या तीन भावडांनी दाखवून दिले आहे.योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक उन्नतीचा सुलभ मार्ग दाखविला आहे. स्वप्निल व आशिष बंधू डि.एड. झाले असून अंकुश मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले असून नोकरीची आशा धूसर झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेतात सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत बागायती शेतीसोबत झेंडू फुलांच्या आंतरपिक शेतीची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. बागायती शेतीतून निघणाºया हिरव्या भाजीपाल्याला परिसरातील नागरिकांची मागणी असल्याचे दिसून येत आहे. कारले , काकडी, लवकी, भेंडी, चवळी, वाल शेंगा, वांगी, भोपळा या पिकांना मोठी मागणीही मिळाली. आधुनिक शेतीतून आर्थिक उलाढाल कशी करता येईल, याचे उत्तम उदाहरण स्वप्निल-आशिष-अंकुश या भावंडानी दिले आहे. अल्प जागेतून उत्तम पीक उत्पादन कसे घेता येईल हे पटवून देण्यासाठी बागायती शेतीसोबत आंतरपिक शेतीचा संकल्प सोडला. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी थेट नागपूर येथे भाजीपाला योग्य दरात देणे सुरू आहे. मंडीपेक्षा भाव पण जास्त मिळतो आहे.नोकरीची वाट पाहत बसण्यापेक्षा पारंपरिक शेत जमिनीत स्वत: राबवून पिकविलेल्या फळांची चव न्यारीच असते. तो आनंद अवर्णनीय आहे.- स्वप्निल नंदनवार,प्रगतशील शेतकरी 

टॅग्स :agricultureशेती