शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

मॅग्निज खाणीत चिनी वायंडर यंत्राचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अ‍ॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक दोनची चिखला भूमिगत खाण आहे. भूगर्भातून मॅग्निज काढण्यासाठी सध्या आधुनिक यंत्राचा वापर येथे करण्यात येतो.

ठळक मुद्देसुटे भाग चीनमधून आयात : आत्मनिर्भर भारतच्या घोषणेनंतर चिनी यंत्रावर बंदीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आत्मनिर्भर भारतची घोषणा झाल्यानंतर चीन येथून आयात होणाऱ्या यंत्रांवर लगाम लागला आहे. परंतु तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध भूमीगत चिखला खाणीत चीनच्या वायंडर यंत्राचा बोलबाला आहे. खाणीतून मॅग्निज काढण्याची मोठी भूमिका वायंडर यंत्र बजावत आहे. आता या यंत्रावरही बंदी येणार काय, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अ‍ॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक दोनची चिखला भूमिगत खाण आहे. भूगर्भातून मॅग्निज काढण्यासाठी सध्या आधुनिक यंत्राचा वापर येथे करण्यात येतो. कमी वेळात जास्त मॅग्निजचे उत्खनन करण्यासाठी टार्गेट दिले जाते. त्यासाठी आधुनिक यंत्राचा पुरवठा केला जातो. सध्या चिखला भूमिगत खाणीत चीनची वायंडर यंत्र येथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.सदर मशीनचे सुटे भाग आयात करण्यात येतात. भारतीय कंपनीसोबत सलग्न असणारी कंपनी वायंडर यंत्राची निर्मिती करते. चिनच्या वस्तूंवर निर्बंध आणल्यानंतर खाण मंत्रालयाने भारतीय कंपन्यांकडून सदर यंत्राचे सुटे भाग निर्मिती करण्याची चाचपणी सुरु केल्याची माहिती आहे. खाणीत चीनच्या यंत्राशिवाय पर्याय नाही.असे काम करते वायंडर यंत्रमॅग्निज खाणीमध्ये वायंडर यंत्र वर लावले असते. भूमिगत खाणीत कामगारांना ने आण आणि भूगर्भातील मॅग्निज वायंडर (केबल) त्या सहाय्याने ओढण्याचे काम यंत्र करते. चिखला खाणीत दोन वायंडर यंत्र आहेत. तीन ते चार वर्षापूर्वी सदर यंत्र येथे बसविण्यात आले होते.कामगारांची संख्या कमीचलॉकडाऊनच्या घोषणेनंतर मॅग्निज खाणीत कामगारांची उपस्थिती ७५ टक्के आहे. चिखला खाणीत एकुण १५०० कामगारांपैकी केवळ ९५० कामगार कर्तव्य बजावत आहेत. यात कंत्राटदार मजूरांचाही समावेश आहे. या मजुरांच्या भरवशावर आणि वायंडर मशीनने उत्खनन केले जाते.चिखला भूमिगत खाणीत तीन वर्षापूर्वी वायंडर यंत्र आले. सुटे भाग चीनमधून आयात करून भारतातील कारखान्यात यंत्र बनविण्यात आले. खाण मंत्रालय याबाबत अंतिम निर्णय घेईल.- राजेश भट्टाचार्य, खाण प्रतिनिधी, चिखला - डोंगरी खाण

टॅग्स :chinaचीन