शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादकांचे नुकसान : उशीरा पेरणी शेतकऱ्यांना भोवली

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : उन्हाळी हंगामातील धानाची लागवड उशीरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक पावसात अडकल्याचे वास्तव आहे. काही भागात सदर पीकाची कापणी व मळणीच पाण्यात सापडल्याने पिकाची ऊशिरा लागवड शेतकऱ्यांना चांगलीच भोवली असुन धानपिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.
लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.
ज्या भागात शासनाचे आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना धानाची केंद्रावर विक्री करतांना ‘पैसे द्या टोकण घ्या’ असे केंद्र चालकासह प्रशासनाकडुन पिळवणुकीचे धोरण अवलंबिले गेल्याची आरोपात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगु लागल्या आहेत.
दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी ऊन्हाळी हंगामात धानाची ऊशिरा लागवड केल्याने पावसाळ्याचे दोन नक्षञ लोटण्याला अवघा आठवडा उरला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात कापणी व मळणी झालेल्या धानासह शेतातील ऊभ्या धानपिकाची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाणी होत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान,पीक कर्ज घेऊन खरीप व ऊन्हाळी हंगामात शेती करणारा शेतकरी निसर्गाच्या प्रकोपात सापडल्याने ऊत्पादित धानाची हानी होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे आधारभुत धान खरेदी केंद्र चालकांकडुन शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत असल्याची देखील संतापजनक चर्चा आहे.
याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यात अडकलेल्या ऊन्हाळी हंगामातील धान ऊत्पादक शेतकºयांची केंद्र चालकांकडुन होणारी पिळवणुक थांबविण्याहेतू उपाययोजना करावी, अशी मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.

धान पोतीही भिजली
अध्यार्हुन अधिक क्षेञातील ऊन्हाळी धानाची कापणी व मळणी आटोपली असतांना काही क्षेञातील धानपिक कापणी व मळणीवाचुन शिल्लक आहेत. कापणी व मळणी झालेले धानाची पोती शासनाने विहीत कालावधित आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने तसेही पावसाने धान पोती भिजल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती