शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. २८.९९ कोटी रूपयांनी तोट्यात

By admin | Updated: June 3, 2016 00:32 IST

भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या वर्षात ११४.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले.

भंडारा रापमं विभाग : टोलनाक्यावर ४.०४ कोटींचा खर्चदेवानंद नंदेश्वर :  भंडारा भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या वर्षात ११४.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला २८ कोटी ९९ लाख रूपयांचा तोटा झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १ कोटी ९९ लाख रूपयांमध्ये वाढ झाली असली तरी विभाग तोट्यात आहे. राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटले नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या आगारांअंतर्गत ९ सेमी लक्झरी, ३५ मिडी असे एकूण ४३९ बसेस आहेत. भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव (अर्जूनी), तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनामुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. भंडारा विभागाला एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ११४ कोटी ४८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला २४ कोटी ९५ लाख, गोंदिया २५ कोटी २९ लाख, साकोली २४ कोटी ४५ लाख, तिरोडा ११ कोटी ४५ लाख, तुमसर २० कोटी ०७ लाख, तिरोडा ११ कोटी ४८ लाख, पवनी आगारात ८ कोटी २४ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी भंडारा विभागाला ११२ कोटी ४९ लाखांचे उत्पन्न झाले होते. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी भंडारा विभागाला १ कोटी ९९ लाखांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. उत्पन्नात वाढ झाली असली तरी डिझेलवर ४५ कोटी ३१ लाख रूपये, टोलटॅक्सवर ४ कोटी ०४ लाख, यासह वेतन,टायर व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला २८ कोटी ९९ लाखाचा फटका बसला. जिल्ह्यातील गाड्यांमध्ये ९ सेमी लक्झरी, ३५ मिडी, मानवविकास मिशनच्या ९१ बसेससह ४०९ बसेसद्वारे वाहतूक नियमित सुरू आहे. आगाराने अलिकडे लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू केल्या आहेत. विभागाअंतर्गत सद्यस्थितीत ६८४ वाहक, ७१६ चालक कार्यरत आहेत. भंडारा विभागाला अनेक वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डिझेलच्या किमती घसल्याने ६ कोटी ५३ लाख रुपयांची बचत झाली आहे. मागीलवर्षी डिझेलवर ५१ कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. एस टी नफ्यात येण्यासाठी योग्य उपाययोजनेची गरज आहे.