शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात नवा रुग्ण नाही । बाधितांची संख्या ४९,अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १०

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसात एकाही कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली नसून शनिवारी आठ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या १० क्रियाशील रुग्ण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत २६६९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर २६०९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३९२ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर साकोली, मोहाडी, तुमसर येथे १४३ व्यक्ती भरती आहेत. २१२६ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.

सुरवातीच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. मात्र गराडा येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली आणि जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधीत व्यक्तीची नोंद झाली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात कोरोनाबाधीतांची संख्या ४९ वर जाऊन पोहचली. त्यातही सर्वाधिक रुग्ण मुंबई-पुणे महानगरातून आलेले आहेत. रुग्ण वाढीच्या संख्येपेक्षा दुरुस्त होणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. शनिवारी ८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या