शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदपुरी तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव परतीच्या वाटेवर !

By admin | Updated: February 21, 2016 00:18 IST

सिंदपुरी येथील तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने राज्य शासनाच्या जलसंधारण विभागात मंजुरीसाठी सादर केला असला तरी,...

दोन वर्षात नुकसान : दोन विभागाच्या वादात रखडलारंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)सिंदपुरी येथील तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने राज्य शासनाच्या जलसंधारण विभागात मंजुरीसाठी सादर केला असला तरी, हा प्रस्ताव परतीच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या तलावाचे वाढते क्षेत्र अधिकारात नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने दोन विभागाच्या वादात तलावाचा विकास प्रभावित झाला आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावर असलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या सिंदपुरी गावात माजी मालगुजारी तलावाची पाळ २३ जुलै २०१४ रोजी फुटली होती. तलावातून विसर्ग होणारे पाणी गावात शिरले होते. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या तलावाची जबाबदारी स्वीकारण्यावरून जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग व लघु पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) या दोन विभागाची यंत्रणा आमने-सामने आली होती. चार गावांच्या हद्दीत असणाऱ्या हा तलाव १३४ एकर जागेत विस्तारित आहे. यामुळे ० ते १०० एकर पर्यंत विस्तारित मामा तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी माधवी खोडे यांच्यासमक्ष आयोजित सभेत दिली होती. असे असताना लघु पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) यंत्रणेने हात वर केले होते. १०० पेक्षा अधिक विस्तारित तलावाची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक स्तर विभागाची असताना या विभागाने जबाबदारीपासून हात झटकले. त्यानंतर राजकीय दबाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात निर्माण करण्यात आला होता. यामुळे या विभागाने २ कोटी ४८ लाख रूपयाचा तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव राज्याच्या जलसंधारण विभागात अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. परंतु दोन वर्षानंतर या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली नाही. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रात तलावाचा विस्तारीत क्षेत्र येत नाही. तलाव १३४ एकर जागेत असल्याने स्थानिक स्तर विभागाची जबाबदारी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय नवीन निकष नुसार जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला ० ते ३० एकर जागेतील तलावाची देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सिंदपुरी तलाव दुरूस्तीचा अंतिम मंजुरीकरिता पाठविलेल्या प्रस्तावाला उलट टपाली परतण्याची वेळ आली आहे. दोन विभागाच्या वादात तलावाचा विकास गुदमरला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या लालफीतशाहीत दोन वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. तलाव दुरूस्तीचे कामे झाली नाहीत. आता नव्याने जबाबदारी स्थानिक स्तर विभागावर येणार आहे. या विभागाचा प्रस्ताव आणखी दोन वर्ष अंतिम मंजुरीसाठी घालवणार आहे. अंदाजे चार वर्षे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या गावातील नागरिक आजही भीषण वास्तव अनुभवत आहेत.तलाव दुरूस्तीच्या कामांना न्याय मिळाला नाही. २५ आपातग्रस्त कुटुंबीयांना घरकूल देता आली नाही. वास्तव्य असणारे टिनाचे शेड जीर्ण झाले आहे. घरकुल मिळण्याच्या आशेत एकाने जगाचा निरोप घेतला आहे. पुराच्या पाण्यात घरे भुईसपाट झाली. शासनाचे दामही दिला नाही. सामाजिक संस्थानी या बेघर गावकऱ्यांना मायेचा आधार दिला. २५ कुटुंबीयांना घरकुल देणार असल्याने सांगण्यात आले. परंतु पॅकेज अंतर्गत आजवर मिळाले नाही. पूरग्रस्तांना देण्यात आलेले आश्वासन हवेत विरले आहे. ५०० एकरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आणणाऱ्या या तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव अंतिम मंजूर होत नाही. खरिपाचे पीक हातून गेले आहे. अधिकार व निकषात या तलावाची देखभाल व दुरूस्ती नसल्याचा कारणावरून हा प्रस्ताव आता जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागात शोभेचे ठरणार आहे.