शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीच्या बळावर शिवानीने खेचून आणले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

जीवनावरील तिचे लेख अनेक ऑनलाइन नियतकालिकांतसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. यानिमित्ताने जे.एम. पटेल महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते तिला मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना डॉ. ढोमणे यांनी तिला पुढील भविष्यासाठी सुयश चिंतिले. ते म्हणाले, परिस्थितीचा कोणताही बाऊ  न करता शिवानीने प्राप्त केलेले हे यश आपल्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी वालदेकर यांची पदव्युत्तर संशोधनासाठी स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठात निवड झाली आहे. राज्य शासनाची छत्रपती शाहू महाराज विदेश शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. घरची परिस्थिती कमकुवत असतानाही तिने हे यश प्राप्त केले. हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर तिचे हे प्रस्तावित संशोधन असणार आहे. शिवानीने स्थानीय जे.एम. पटेल महाविद्यालयातून पदवी आणि समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले.  दलित आणि स्त्री- जीवनावरील तिचे लेख अनेक ऑनलाइन नियतकालिकांतसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. यानिमित्ताने जे.एम. पटेल महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते तिला मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना डॉ. ढोमणे यांनी तिला पुढील भविष्यासाठी सुयश चिंतिले. ते म्हणाले, परिस्थितीचा कोणताही बाऊ  न करता शिवानीने प्राप्त केलेले हे यश आपल्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे. शिवानीने आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना यशाच्या नवीन दिशा दाखविलेल्या आहेत. संचालन करताना डॉ. प्रदीप मेश्राम यांनी शिवानीने शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि तिने प्राप्त केलेल्या यशाची उजळणी करताना तिने अधिक मोठे यशोशिखरे गाठावीत, अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिक्कर यांच्या सहयोगाने समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांनी केले.  प्रसंगी प्रा. सुमंत देशपांडे, डॉ. निशा पडोळे, डॉ. विनी ढोमणे, डॉ. विजया कन्नाके, प्रा. ममता राऊत, अजय देवकाते, भोजराज श्रीरामे, तसेच समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक किरण राघोर्ते, तृप्ती गणवीर आणि  अंतर्गत  गुणवत्ता  कक्षाचे सदस्य डॉ. वीणा महाजन, डॉ. अपर्णा यादव, डॉ पद्मावती राव आदींची उपस्थिती होती.

स्वतःला परिपक्व करा- जे. एम. पटेल महाविद्यालयाने तिला तिचा सामाजिक दृष्टिकोन घडविण्याची संधी दिली. त्यामुळे तिला शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन प्राप्त झाले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्त्री अध्ययन अभ्यास आणि इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या क्रियाशील सहभागामुळे मी अधिक प्रगल्भ झाली. अशा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग नोंदवून स्वतःला परिपक्व करावे, असा सल्ला शिवानी वालदेकर हिने दिला. 

 

टॅग्स :Educationशिक्षण