शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच आरक्षण सोडत ५ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी रोजी ...

भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी रोजी संबंधित तहसील कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत काढल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होऊन १८ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित झाले. शासनाने निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रचंड उत्सुकता लागली होती. आता जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहेत. तहसीलदारांच्या अध्यक्षतेत ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक झालेल्या १४८ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण यावेळी जाहीर केले जाणार आहेत. त्यात महिलांसाठी ५० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित राहणार आहेत. यासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग अशी सोडत ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. आरक्षण काढण्यात येणाऱ्या ५४१ ग्रामपंचायतींमध्ये तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७६, भंडारा ९४, पवनी ७९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील सर्व सातही तहसीलदारांना पत्र पाठवून सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ५४१ ग्रामपंचायतींचा एकाच वेळी विचार करून पुढील पाच वर्षासाठी म्हणजे २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. गत दोन आठवड्यापासून उत्सुकता लागून असलेल्या सरपंच आरक्षणाची सोडत निघत आहे. आता कोणती ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर सर्व आराखडे अवलंबून राहणार आहेत.

१५ फेब्रुवारीला सरपंच - उपसरपंचांची निवड

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत निघाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची निवड १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. एकदा आरक्षण कळल्यानंतर सरपंच पदासाठी गावागावांत मोर्चेबांधणी केली जाणार आहे.