शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यातील आरोग्यसेवा ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. अपघाताच्या नेहमीच घटना घडतात. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना एमएलसी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे जखमींना घेवून भंडारा येथे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

ठळक मुद्देडॉक्टरांचा अभाव : इमारत, रुग्णवाहिका, निवासी डॉक्टर आदींची कमतरता, रुग्णांचे हाल

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : ग्रामीण आरोग्य सेवेवर शासन कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत असली तरी लाखनी तालुक्यातील आरोग्य सेवा मात्र सलाईनवर असल्याचे दिसत आहे. आरोग्य केंद्र इमारत, रुग्णवाहिका आणि निवासी डॉक्टरांची कमतरता असल्याने ग्रामीण रुग्णांचे मोठे हाल होत आहे.लाखनी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, अ‍ॅलोपॅथिक व आयुर्वेदिक दवाखाने आहे. परंतु सद्यस्थितीत लाखनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. अपघाताच्या नेहमीच घटना घडतात. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना एमएलसी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे जखमींना घेवून भंडारा येथे जाण्याशिवाय पर्याय नसतो.रिक्त पदांचे ग्रहण१९९९ मध्ये लाखनी तालुका निर्मितीनंतर ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. सुरूवातीपासूनच ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अद्यापही भरले नाही. दोन पदे रिक्त आहे. एमबीबीएस महिला डॉक्टर नाही. चार वैद्यकीय अधिकाºयापैकी केवळ एकच पद भरलेले आहे. एक डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. येथे दररोज ५०० ते ६०० बाह्यरुग्णांची नोंद होते. यासोबतच शिपाई व सफाई कामगारांची पदे रिक्त आहे.पोलिसांची डोकेदुखीलाखनी हे संवेदनशील गाव आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहे. पालांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनगृह नसल्याने मृतदेह लाखनी येथे आणावे लागते. त्यामुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आवश्यक असतो. परंतु पोलिसांना वैद्यकीय अहवाल मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भंडारा येथे जाण्याची वेळ पोलिसांवर येते.

टॅग्स :Healthआरोग्य