शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

दुधाचे १८ कोटींचे देयक अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे.

ठळक मुद्देसंस्थाचालकांचा जिल्हा दुग्ध संघाला घेराव : दुधाचा पुरवठा न करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे गत १६० दिवसांचे १८ कोटींचे देयक अडविल्याने संस्था व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुधाचे देयक तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेकडो संस्था पदाधिकाऱ्यांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघाला घेराव घातला. १० दिवसात देयक न दिल्यास संघाला दुधाचा पुरवठा न करण्याचा इशारा दूध संस्था चालकांनी यावेळी दिला.भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनासह पूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय नगदी पिकासारखा असून शेतकरी आपला प्रपंच चालवित असतो. जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जिल्हा दूध संघाने अचानकपणे एप्रिल २०१९ पासून दूध संस्था व शेतकऱ्यांचे देयक अडवून ठेवले आहे. संस्थांचे देयक अडविल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक लहान संस्था बंद पडल्या आहेत. परंतु, त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही.या संस्थांचे १६० दिवस अर्थात १६ आठवड्यांचे देयक तातडीने देण्यात यावे, यासाठी दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अखेरीस, शनिवारी शेकडो संस्थाचालकांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध संघाला घेराव घालून देयक अदा करण्याची मागणी लावून धरली. आता देयकाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :milkदूध