शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे न्याय मागण्यांसाठी निदर्शने

By admin | Updated: April 24, 2017 00:54 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचे भूमीपूजन माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते २२ एप्रिल १९८८ ला झाले.

गोसीखुर्द धरणस्थळी आंदोलन : मेणबत्ती पेटवून केली भूमिपूजनाची आठवणपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचे भूमीपूजन माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते २२ एप्रिल १९८८ ला झाले. या भूमीपूजनाला २९ वर्षे पुर्ण झालीत. या भूमीपूजनाची सरकार व अधिकाऱ्यांना आठवण करुन देण्यासाठी व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे २२ एप्रिलला गोसीखुर्द धरणाच्या भूमीपूजन स्थळी निदर्शने करुन मेणबत्ती पेटविण्यात आली. गोसीखुर्द धरणाला आज २९ वर्ष पुर्ण झाले. पण ना धरण पुर्ण झाले ना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले. पण धरणाची किंमत कितीतरी पटीने वाढली आहे. प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी लढत आहेत. याचे अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. पण अजुनही समस्या प्रलंबीत आहेत. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे मेणबत्ती पेटविण्यात आली. सायंकाळी ६ वाजता पाथरी, गोसेबुज, गोसीखुर्द, मेंढा, चिचखेडा, नवेगाव आदी गावातील प्रकल्पग्रस्त भुमीपूजन स्थळी जमा झाले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी घोषणाबाजी, नारेबाजी करुन वातावरण तापविले होते. ही नारेबाजी दिड तासांपर्यंत सुरु होती. संघर्ष समितीचे सयोजक विकास भोंगाडे, वामन भोयर, समिक्षा गणवीर, शंकर माटे, नंदू कुर्झेकर, गुणवंत मेश्राम आदीनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली. याचवेळेस प्रकल्पग्रस्तांनी भूमीपूजन स्थळी शेकडो मेणबत्ती पेटवून भूमीपूजनाच्या आठवणींना उजाळा करुन दिला.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याचे निवेदन प्रशासनातर्फे पवनीचे तहसिलदार सुखदेव वासनीक, धरण विभागातर्फे कार्यकारी अभियंता बावनगडे व पोलीस विभागातर्फे पोलिस उपनिरीक्षक सुहास चौधरी यांनी स्विकारुन शासनकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विलास भोंगाडे, प्रकाश मेश्राम, वसंता आगारे, श्रीहरी आगरे, वामन भोयर, समिक्षा गणविर, गुलाब मेश्राम, विलास ठाकरे, सोमेश्वर भुरे, शंकर माटे, नंदू कुर्झेकर, झिबल गणवीर, माणिक दुबे, भिमराव भिमरे, रमेश भोयर, दादा आगरे, धर्मराज भुरे, आसाराम मेश्राम, गणेश आगरे, ढेकल मेश्राम, किशोर समरीत, विश्वनाथ वाडीभस्मे दिगांबर कुर्झेकर, प्यारेलाल मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)