शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

अटींचे पालन करून नवदाम्पत्य विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता शासकीय नियम व अटींची पुर्तता येथील ...

ठळक मुद्देठवरे कुटुंबातील विवाह सोहळा : मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता शासकीय नियम व अटींची पुर्तता येथील एका विवाह समारंभात करण्यात आली. येथील रहिवासी व गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांच्या मुलाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने मोजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत पार पडला. शारीरिक अंतर ठेवून नवदाम्पत्यांसह इतरांनी मास्क वापरून उपस्थिती दर्शविली.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांचे चिरंजीव सुजीत यांचा विवाह गावातीलच सुरेश रामटेके यांची मुलगी काजल यांच्याशी सामाजिक रितीरिवाजाप्राणे ४ महिन्यांपुर्वीच ठरला होता. दोन्ही पक्षाकडून २६ मे ही तारीख विवाहाची निश्चित करण्यात आली होती. मुला-मुलींच्या वडिलांनी लग्नपत्रिका सुद्धा छापून घेतल्या व लग्नाची तयारी झाली होती. मात्र अचानक कोरोनाचा शिरकाव झाला व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ‘लॉकडाऊन’ तसेच संचारबंदी घोषीत करण्यात आली. यात विवाह सोहळयांवर निर्बंध लादण्यात आले. विवाह ठरलेल्या दिवशीच करायचा असा दोन्ही बाजूंनी ठरवले व कोणताही बडेजाव न करता अगदी साध्या पद्धतीने गावामधील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२६) ‘शुभमंगल’ लावण्यात आले. विवाह समारंभाचे साक्षी होण्यासाठी गावचे सरपंच राधेशाम झोळे, माजी जि.प. सदस्य डॉ.शमकांत नेवारे, माजी पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, तंमुसचे अध्यक्ष अधि. श्रीकांत बनपुरकर यांची उपस्थिती होती. बौद्ध विधीचे पठन करून एकनाथ बोधी यांनी नवदाम्पत्यांना विवाह बांधणात बांधले. उपस्थितांनी पुष्पवर्षाव करून आशीर्वाद दिला.

टॅग्स :marriageलग्न