शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महा ई-सेवा केंद्राच्या संचालकांना तुटपुंजे मानधन

By admin | Updated: April 12, 2017 00:51 IST

राज्य शासन सन २००८ पासून महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्र सुरु करून ग्रामीण भागातील जनतेचे कामे जनतेच्या सोईनुसार त्यांच्या गावातच व्हावे, ....

महागाईचे संकट : युनियनच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : राज्य शासन सन २००८ पासून महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्र सुरु करून ग्रामीण भागातील जनतेचे कामे जनतेच्या सोईनुसार त्यांच्या गावातच व्हावे, या उद्देशाने महा ई-सेवा केंद्र सुरु केले आहे. मात्र या महा ई-सेवा केंद्र संचालकांना अल्पशा कमिशनवर महाआॅनलाईन ही कंपनी राबवित असून आता या केंद्र संचालकांना अल्पशा मानधनावर केंद्र व कुटुंबाचा उदरर्निवाह कसा करायचा, या समस्यांचे निवदेन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय मते यांनी दिले.जिल्ह्यात १८० महा ई-सेवा केंद्र सुरू असून त्याचे रुपांतर नुकतेच महाराष्ट्र शासनाने महा ई सेवा सोबत ‘आपले सरकार’ म्हणून केले आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेचे कमी तालुक्याच्या ठिकानात न जाता गावातच त्यांची कामे कमी व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे. या महा ई सेवा केंद्रातुन जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, अधिवासी दाखला, सातबारा नमुना आठ व इतर महसुली सेवा संबंधी कामे केली जातात.मात्र या मागे या केंद्र संचालकांना अत्यल्प कमीशन मिळत असल्याने या केंद्र संचालकांचा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. हे केंद्र संचालक लाखो रूपये गुंतवून लॅपटॉप, कॅम्प्युटर, प्रिंटर, रूम, नेटचे बिल, इलेक्ट्रीक बिल, आॅपरेटर खर्च आदी हे गावात राहून सहन करीत आहेत. मागील एक महिन्यापासून महाआॅनलाईन कंपनीचा जिल्हा समन्वयक नाही. त्यामुळे पोर्टलवर उपस्थित होणारे अडथळे केंद्र संचालकांना दूर करता येत नाही. या केंद्र संचालकांकडून फेब्रुवारी २०१६ मध्ये जिपीएस मॅपिंग करवून घेतले. त्याचा अजूनपर्यंत मोबदला दिला गेला नाही. आधार केंद्र चालकांचे कमीशन ६ महिन्यापर्यंत मिळत नाही. आधार केंद्र चालकांचे कमीशन ५ ते ६ महिन्यापर्यंत मिळत नाही. कंपनीने दिलेली पॉस मशीन ही केव्हाही बंद पडते. हे कॅशलेस व्यवहारावर अडचण निर्माण करते, सातबारा अद्ययावत झालेला नाही व या कारणाने केंद्र चालकावर अन्याय होत आहे. महागाईच्या काळात हा खर्च केंद्र चालकांना परवडणारा नाही. सरकार व्यावसायिकांकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. परंतु सरकारला हे महसूल उत्पन्न मिळवून देणारे सेतू केंद्र चालकांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे या निवेदनातून स्पष्ट केले आहे. या विषयांकडे लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या हेतुने महा ई-सेवा व्ही एल ई युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी केंद्र चालक हिरामन मेंढे, राजकुमार गिऱ्हेपुंजे, हिरामन गिऱ्हेपुंजे, समीर नवाज, राकेश वासनिक, दिपक हातेस्कर, लोकेश मेश्राम, दादाराम भुरे, विनोद भोयर, वसंत काकडे, भास्कर मारबते, बबन मुरकुटे, प्रविण पातेवार, रविंद्र बुराडे, सचिन सार्वे, प्रदिप चवरे, मोहन भार्वे, किरण बडवाईक, विकास बोरकर, महेंद्र वहिले यांच्यासह अन्य केंद्र संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)