लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाळी येथे स्वतंत्र सिंचनातून रोवणी सुरू करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पट्टा पद्धत व श्री पद्धतीचा आधार घेत रोवणीचा श्रीगणेशा प्रगतशील शेतकरी पंकज घाटबांधे यांच्या शेतात सुरू झालेला आहे.
रोवणीप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी पट्टा पद्धतीचे फायदे सांगितले. कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी कोणते पीक घ्यायचे याची माहिती दिली. प्रगत शेतीसाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याचेही मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे, कृषी सहाय्यक शेखर निर्वाण, पाणलोट समिती सचिव योगेश्वर घाटबांधे, कृषीमित्र लेकराम चौधरी, कृषिसखी सुषमा भांडारकर, सीआरपी भारती रणदिवे, चेतना तिरपुडे, रेणुका धकाते उपस्थित होते.
प्रगतशील शेतकरी पंकज घाटबांधे यांच्या बंधाऱ्याच्या लगतच्या सात-आठ एकरावरील शेतीवर डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी देऊन जपानी पद्धतीने रोवणी करण्यात आली. रोवणी करायला चार पुरुष, तर १५ महिला मजूर होते. गोसे धरणातील पाणी गावच्या मोठ्या तलावात नालीद्वारे सोडण्यात आले. सध्या नहरातील कचरा काढून खोल करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर तलावातील पाणी नहराद्वारे गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतरच गावातील रोवणीचे काम सुरु होणार आहेत. ज्यांच्याकडे मोटार पंप किंवा विहिरीचे साधन आहे तसेच तलावाचे पाणी आणि इतर पाण्याचे साधन आहेत अशांनी रोवणीला सुरुवात केलेली आहे. गावातील इतर मजूर बाहेरगावी रोवणीसाठी जात आहेत.
पट्टा पद्धतीचे फायदे
पट्टा पद्धतीने रोवणी केल्याने धानाच्या रोपांना सरळ रेषेत सूर्यप्रकाश मिळतो. फवारणी, डवरणी, तण काढणे, खत देणे, रोगाची शहानिशा करणे, यासाठी सुलभता निर्माण होऊन उत्पन्नवाढीला मोठी मदत होते. पºह्यांची गरजेपेक्षा अधिक वाढ झाल्यास त्याची कापणी करून रोवणी करावी. तसेच धुºयावरील कचरा साफ केले असता किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
पट्टा व जपानी पद्धतीने रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST
प्रगतशील शेतकरी पंकज घाटबांधे यांच्या बंधाऱ्याच्या लगतच्या सात-आठ एकरावरील शेतीवर डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी देऊन जपानी पद्धतीने रोवणी करण्यात आली. रोवणी करायला चार पुरुष, तर १५ महिला मजूर होते. गोसे धरणातील पाणी गावच्या मोठ्या तलावात नालीद्वारे सोडण्यात आले. सध्या नहरातील कचरा काढून खोल करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर तलावातील पाणी नहराद्वारे गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पट्टा व जपानी पद्धतीने रोवणी
ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : किटाळी येथे स्वतंत्र सिंचनातून केली रोवणी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}