शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या

बारव्हा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या एका बाजुला असायची व त्यासाठी राखीव शासकीय जागा राहत होती. मात्र सरकारी जागेवर बांधकामे झाल्यामुळे शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे काही गावामध्ये घराशेजारी दिसून येतात. परिणामी या शेणखताच्या ढिगाऱ्यांमुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागात स्वच्दता राहावी व त्यापासून कोणताही आजार होऊ नये म्हणून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीतील गावामध्ये असणारे शेणखताचे ढिगारे त्वरीत गावाबाहेर काढावे. याबाबतचे आदेश दिले होते. त्या आदेशाची पंचायत समिती कार्यालयाने दखल घेवून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत दखल घ्यावी याबाबत लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतने आदेशाचे पालन न करता चक्क त्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली असल्याचे समजते. तथापि शेखणखताचे खड्डे रोगराईचे माहेरघर असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील जनतेसाठी राहणीमान सुंदर व स्वच्छ राहण्याकरिता राबविले जातात. मात्र त्यात अपयश आल्याचे चित्र लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, पारडी, मुरमाडी, मानेगाव येथे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना असल्या तरी गावकऱ्यांच्या असहकार्यामुळे त्या निष्फळ ठरल्या आहेत. ग्रामस्थांनी शेणखताचे ढिगारे मुख्य रस्त्यावर टाकले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यापासून जलजन्य आणि किटकजन्य आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबद स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)