शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींच्या वीज बिल माफप्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. आज येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

ठळक मुद्देयुनिव्हर्सल फेरो : १७ वर्षांपासून कारखाना बंद, दीड हजार कामगार बेरोजगार

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मॅग्निज शुद्ध करणाऱ्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचे तब्बल २०० कोटी रुपयांचे वीज बिल शासनाने माफ केले होते. त्यानंतरही हा कारखाना सुरु झाला नाही. करारभंगाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती आहे.तुमसर जवळ युनिव्हर्सल फेरो हा मॅग्निज शुद्ध करणारा कारखाना आहे. परंतु गत १७ वर्षांपासून तो बंद आहे. या कारखान्याचे दीड हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत साडेतीन वर्षापूर्वी राज्याच्या उर्जा मंत्रालयाने पुढाकार घेत आजारी कारखान्यांचे वीज बिल माफ केले होते. त्यात तुमसरच्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचाही समावेश होता. वीज बिल माफ करताना कारखाना सुरु करण्याची अट होती. अटीच्या अधीन राहूनच वीज बिल माफ करण्यात आले. परंतु तीन वर्षानंतरही कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही.उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. आज येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली असून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.आजारी कारखाने पुनरूज्जीवनाला वेगराज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारी कारखान्याचे पुनरूज्जीवन करण्याचे सुतोवाच केले. त्या अनुषंगाने युनिव्हर्सल कारखाना सुरु होण्याच्या बाबीला बळ मिळाले आहे.आदित्य ठाकरे चांदपूरला येणारनागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमंताच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती आहे.त्यांनी चांदपुरच्या हनुमानाचे फोटो आणि माहिती मागितली आहे. त्यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो कारखान्याचे वीज बिल माफ प्रकरणाची माहिती दिली जाणार आहे.

टॅग्स :electricityवीज