शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून ...

मोहाडी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : विदर्भ राज्य आंदोलन समिती सरसावली भंडारा : एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास ३०० कुटुंबे बाधित झाली आहेत. आता पावसाळा लवकरच सुरु होत आहे. आणि त्यामुळे या भागातील गरीब कुटुंबाना तातडीने शासकीय मदत पुरविली जाने अतिशय गरजेचे आहे. असे असले तरी प्रशासन संथ गतीने कार्यवाही करीत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा जिल्हा याबाबत न्याय मिळवून देण्यास पुढे सरसावली असून ३ जून रोजी कोअर कमिटी सदस्य माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह मोहाडीचे तहसिलदार देशमुख यांना घेराव करण्यात आला. वाऱ्याचा वेग व पर्जन्य मापनाची व्यवस्था आमच्याकडे नाही. अशी सबब सांगून प्रकरणे निकाली काढता आले नाही असे उत्तर देताच माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी प्रत्यक्ष घरांचे पडझड होऊन मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले. लोकांचा संसार पावसात वाहून गेल्यानंतर मदत पाठवणार आहात का? असा प्रश्न अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने कर्तव्यात दिरंगाई करु नये. अन्यथा पावसाळा सुरु झाल्यावर जन आक्रोशाचा बांध फुटेल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देवून बाधित कुटूंबांना आर्थिक व वस्तुरुप मदत पुरवावी, अशी मागणी केली. माजी आमदार मधुकर कुकडे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे तयार केले नाही. यावरुन प्रशासन कासवगतीने चालत आहे. याकडे लक्ष वेधून पावसाळा सुरु होण्याच्या आधी लोकांना शासकीय मदत उपलब्ध करुन द्या असे सांगितले.तहसिलदार देशमुख यांनी सांगितले की, ७ व २७ एप्रिल २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १९ घरांचे नुकसान झाले तर ४, ५, १२ मे २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १०३ घरांचे नुकसान झाले. २०, २१ व २७ मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १५४ कुटूंबे बाधित झाली, असे एकुण २७६ कुटूंबे बाधित झाली. यात पोल्ट्रीफार्म मधील कोंबड्याचा सुध्दा समावेश आहे. वादळाचा ताशी वेग उपलब्ध नसल्यामुळे अतिवृष्टी झाली नसल्यामुळे सदर पंचनामे नियमाप्रमाणे निकाली काढता आले नाही. विशेष बाब अंतर्गत मंजूरीसाठी प्रकरणे जिल्हाधिकाऱ्याकडे ३० मे रोजी पाठविल्याचे सांगितले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने तहसिलदारांना उपरोक्त मागणीसाठी निवेदन सादर केले. यावेळी महासचिव रमाकांत पशिने, उपाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, अविनाश पनके, कोषाध्यख अर्जुन सुर्यवंशी, युवाध्यक्ष तुषार हटेवार, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष केशव हुड, दामोधर क्षिरसागर, ग्रामीण अध्यक्ष प्रा. प्रेमलाल लांजेवार, देवदास गभणे, विजयकुमार दुबे, जाधवराव साठवणे, विजय पारधी, गोविंदराव चरडे व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)