शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त अभियानात लोकसहभाग वाढवा

By admin | Updated: May 7, 2017 00:25 IST

शासकीय योजना कार्यान्वीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्याची जबाबदारी लोक सहभागाव्दारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सेंदूरवाफा येथे जलयुक्त शिवाराचा आढावा बैठकलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय योजना कार्यान्वीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्याची जबाबदारी लोक सहभागाव्दारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अभियानात लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा. लक्षावधी लोकांच्या जीवनात बदल करण्याचे सामर्थ्य जलयुक्त शिवार अभियानात आहे. जलयुक्त शिवरची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले.शासकीय तंत्रनिकेतन सेंदूरवाफा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या धोरणानुसार महत्वाचे जलयुक्त शिवार अभियानातील प्रस्तावित २०१६-१७ या वषार्तील कामे ३१ मे २०१७ पूर्वी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी आमदार राजेश काशिवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, साकोली उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी एस.के.सांगळे, तहसिलदार अनिल खडतकर, लाखनी तहसिलदार राजीव शक्करवार, लाखांदूर तहसिलदार यु.एस.मेश्राम, खंड विकास अधिकारी सुनिल तडस, खंड विकास अधिकारी ब्राम्हणकर, खंडविकास अधिकारी देवीदास देवरे उपस्थित होते.याप्रसंगी आमदार राजेश काशिवार यांनी शेतकरी हिताचे धोरणानुसार शासन सिंचन क्षेत्रावर निधी उपलब्ध करुन देत असून पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वय साधून जलदगतीने विकास कामे पूर्ण करावे. आढावा बैठकीत साकोली उपविभागाअंतर्गत २०१६-१७ चे जलयुक्त शिवार मधील प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. साकोली तालुक्यात २९४ प्रस्तावित कामांपैकी ८५ कामे रद्द झाली. यापैकी ७८ कामे कामे पूर्ण झाली असून ७३ कामे सुरु आहेत.व ५८ कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. लाखनी तालुक्यातील ३७५ प्रस्तावित कामांपैकी ११३ कामे रद्द झाली आहेत. यापैकी ७७ कामे पूर्ण तर ५६ कामे प्रगतीपथावर असून १२९ कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. लाखांदूर तालुक्यात १५६ प्रस्तावित कामापैकी १४ कामे रद्द झाली असून ७६ कामे पूर्ण झाली आहेत. ५६ कामे प्रगतीपथावर असून १० कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. संचालन व आभार तालुका कृषी अधिकरी चौधरी यांनी केले.