शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 31, 2015 00:25 IST

मुजबी ते पारडी (नाका) पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण खासगी कंपनीने केले. मर्यादित कालखंडाअगोदर काम पूर्ण केले.

भौगोलिक परिस्थितीविरुद्ध कामे : अपुऱ्या नाल्या, बसस्थानक नाही, पथदिवे बंदजवाहरनगर : मुजबी ते पारडी (नाका) पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण खासगी कंपनीने केले. मर्यादित कालखंडाअगोदर काम पूर्ण केले. परिणामी कंत्राटदार व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे रस्त्यालगत असलेली गावे समस्याने ग्रासली आहेत. यावर तोडगा लवकरात लवकर काढण्यात यावा अन्यथा माथनी टोलनाका येथे आंदोलन करण्याचा इशारा ठाणाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी दिला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत अतिवर्दळीचा ठरत असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे एशियन महामार्ग ४७ झालेले असून रुंदीकरण मागील वर्षी खासगी कंपनीने पूर्ण केले. दर्शन भोंदे, खरबीचे सरपंच मोथरकर, ठाणाचे सरपंच कल्पना निमकर व ग्रामपंचायत सदस्य माथनी टोलनाक्याचे व्यवस्थापक जी. एम. सी. कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत गावागावातील सदस्यांनी सुमारे ६९ किलो मीटर रस्त्याची पाहणी केली. या परिसरात सोईस्कर रस्ते तयार करण्यात आलेले नाही. खरबी (नाका) रहदारीकरिता रस्ताच नाही. येथे नियमित अपघात घडत आहे. येथील रुंदीकरणात गेलेल्या घरांचा अजूनपर्यंत लाभधारकांना मोबदला मिळाला नाही. ठाणा पेट्रोलपंप येथील दोन्ही दिशेला आयुध निर्माणीचे जुन्याच स्थळी बसस्थानक बांधावे, असे पत्र देऊनसुध्दा बसस्थानक तयार करण्यात आलेले नाही. ठाणा पेट्रोलपंप या गावाचे नामदर्शक फलक लावण्यात आलेले नाही. रहदारी दरम्यान पार्किंगची स्थिती दर्शविणारा फलक नाही. ट्रक थांबा नाही. तिन्ही गावात पथदिवे बंद राहत असतात. सर्व मुलभूत सोई जी.एम.सी.ने पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.रस्ता लगबगीने ठरवून दिलेल्या कालखंडाअगोदर अपूर्ण अवस्थेत सुरु करण्यात आला. कामाची गुणवत्ता व गावागावातील भौगोलिक परिस्थितीच्या विरुद्ध रस्त्यावरील कामे करण्यात आली. गावालगत रस्त्यावरील पाणी हे गावाबाहेर न काढता गावातच पाणी शिरत आहे. अर्धवट नाल्यामुळे गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. परिणामी प्रत्यक्ष रोगराईला आमंत्रण देण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्या शाळकरी, कामगार यांना सोईचे बसस्थानक तयार करण्यात आलेले नाही. ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता प्रवासी रस्त्यावर बसची प्रतीक्षा करीत उभे राहत आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खरबी (नाका) ठाणा पेट्रोलपंप शहापूर येथील गावांची समस्या जाणून घेण्यासाठी ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती ठाणाचे सदस्य राजेश मेश्राम, शहापूर पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आंदोलनाचा इशाराराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या रुंदीकरणाचे काम द्वितीय बिलकॉम व जे.एम.सी. यांनी केले. यात अनियमितता असून मागील आठवड्यात १२ ते १३ आॅगस्ट दरम्यान ठाणा-शहापूर-खरबी येथे अतिवृष्टी झाली. यावेळी रस्त्यालगत घरात चार फूट पाणी साचले परिणामी जनतेला लाखो रुपयांचा जीवनावश्यक वस्तूंचा फटका बसला. याला ठाणा येथील देवेंद्र किराणा दुकानाची लाखोंची साखर, डाळ, पोहे, मीठ, पीठ इत्यादी वस्तूंची नासधूस झाली. याला कारणीभूत सदर कंपनी व जे.एम.सी. असल्याममुळे याची भरपाई देण्यात यावी. शहापूर उड्डाण पुलाची विचिंग तयार करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी दिला.